मराठवाड्यात दीड महिन्यात 77 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 फेब्रुवारी 2019

मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबत नसल्याचे चित्र असून, जानेवारी महिन्यात तब्बल 66, तर 11 फेब्रुवारीपर्यंत 11 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबत नसल्याचे चित्र असून, जानेवारी महिन्यात तब्बल 66, तर 11 फेब्रुवारीपर्यंत 11 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. यातील लातूर, परभणी, नांदेड जिल्ह्यांतील प्रकरणांची छाननी करण्यात आली; मात्र अन्य जिल्ह्यांत प्रकरणांच्या छाननीसाठीची बैठकही घेण्याची तसदी प्रशासनाने घेतली नाही. 

गेल्या अनेक वर्षांपासून मराठवाड्यात नापिकी आणि दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्येची संख्या वाढत आहे. यंदा अल्प पावसामुळे बहुतांश भागांत दुष्काळ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती अपेक्षित उत्पन्न आलेले नाही; तसेच हाती आलेल्या शेतीमालालाही योग्य भाव मिळत नाही. त्यातच सरकारच्या कर्जमाफीचा गोंधळ अजून संपलेला नाही. त्यामुळे बॅंका व सावकाराकडून घेतलेले कर्ज कसे फेडावे, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. त्यातूनच जानेवारी महिन्यात मराठवाड्यातील 66, तर 11 फेब्रुवारीपर्यंत 11 अशा एकूण 77 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद विभागीय आयुक्त कार्यालयाकडे आहे. 

अनुदानास पात्र प्रकरणे 

7 पैकी 3 
लातूर 

6 पैकी 1 
परभणी 

9 पैकी 1 
नांदेड.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 77 farmers suicides in Marathwada