राज्यात आतापर्यंत ८ लाख कर्करुग्णांवर उपचार - राजेश टोपे

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 4 February 2020

कर्करोगावर आयुर्वेदिक उपचार 
कर्करोगावर आयुर्वेदिक उपचार पद्धती किती प्रभावी ठरू शकते, यावर टाटा रुग्णालयात अभ्यास सुरू आहे. पुन्हा बळावणारा कर्करोग आणि केमोथेरपीचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपचारांबाबत प्रयोग सुरू असून, माहिती संकलित केली जात आहे, असे रुग्णालयातर्फे सांगण्यात आले. कर्करोगावर आयुर्वेदिक उपचार पद्धती प्रभावी असल्याचा दावा केला जातो; परंतु तिची लाभदायकता तपासण्याची प्रमाणित प्रक्रिया नाही, अथवा प्रयोगाद्वारे माहिती तयार करण्यात येत नाही. या पार्श्‍वभूमीवर टाटा कर्करोग रुग्णालयात आयुर्वेदिक उपचार पद्धतीवर अभ्यास केला जात असल्याचे टाटा मेमोरियल सेंटरच्या शैक्षणिक विभागाचे संचालक श्रीपाद बनावली यांनी सांगितले.

मुंबई - राज्यात कर्करोगाचे निदान व उपचार करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे आठ लाख कर्करुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. १४ जिल्ह्यामध्ये केमोथेरेपी केंद्र सुरु करण्यात आले असून आतापर्यंत दोन हजार ८०० रुग्णांना त्याद्वारे उपचार मिळाले आहेत. कर्करोगाबद्दल जागरुकता निर्माण करतानाच उपचारासाठी महाराष्ट्र कॅंन्सर वॉरिअर’ मार्फत २३ जिल्ह्यामध्ये सेवा दिली जात आहे. आतापर्यंत ४० हजार रुग्णांची तपासणी त्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यात सध्या अमरावती, गडचिरोली, भंडारा, सिंधुदुर्ग, सातारा, नाशिक, पुणे, जळगाव, अकोला, वर्धा, रत्नागिरी, बीड, जालना, नंदूरबार या जिल्ह्यांमध्ये केमोथेरेपी केंद्र सुरु झाले आहे. कोल्हापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील फिशिजियन व परिचारिकांना केमोथेरेपीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. ठाणे, रायगड, नगर, परभणी, हिंगोली, बुलडाणा, वाशिम येथे प्रशिक्षण सुरु आहे.

...म्हणून विधानपरिषद निवडणूक लढविणार : उद्धव ठाकरे

सर्व सामान्यांना आवाक्‍याबाहेरील वैद्यकीय उपचारासाठी सुरु असलेल्या महात्मा फुले जन आरोग्याच्या माध्यमातून आतापर्यंत कर्करोगाशी संबंधीत विविध उपचार सुमारे ८ लाख रुग्णांवर करण्यात आले आहेत. या योजनेमुळे सामान्यांना दिलासा मिळाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 8 lakh cancer patients are treated in the state