esakal | ...म्हणून विधानपरिषद निवडणूक लढविणार : उद्धव ठाकरे
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

सीमाभागातील नागरिकांना न्याय मिळवून देणार हे नक्की आहे. त्यासाठी कठोर पाऊले उचलणार आहे. गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकार कर्नाटक सरकारच्या बाजूने न्यायालयात प्रयत्न करत आहे, हे धक्कादायक आहे

...म्हणून विधानपरिषद निवडणूक लढविणार : उद्धव ठाकरे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी पार पाडण्यासाठी विधान परिषदेत जाण्यात गैर काय आहे. विधानसभेला निवडून आलेल्या नेत्याला राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढण्यापेक्षा विधानपरिषद लढविणे योग्य आहे. याबाबत लवकरच सर्वकाही स्पष्ट होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर प्रकार टाकला आहे. मुख्यमंत्री होण्याच्या स्वप्नापासून भाजपने दिलेले वचन कसे मोडले यावर त्यांनी भाष्य केले. संजय राऊत यांनी यापूर्वी काही गोष्टीवर न झालेल्या गोष्टींवर प्रकाश टाकला आणि त्याला उद्धव ठाकरे यांनी सडेतोड उत्तरे दिली.

वचन मोडल्यावर दुसरा पर्याय नव्हता, म्हणून... : उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे म्हणाले, की भाजप पक्ष फोडून माणसे घेत असेल तर आम्ही मग त्या पक्षासोबत जायला काय हरकत आहे. काश्मीरसारखे आम्ही दहशतवाद्यांसोबत तरी गेलो नाही. नैतिकतेच्या गोष्टी यांनी आम्हाला शिकवू नये. आज भाजपमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीमधून आलेले अनेक नेते आहेत. इतर राज्यांतही तशीच परिस्थिती आहे. मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत सरकारी शब्द समजून घ्यावे लागले. सत्तेची खुर्ची माझ्यासाठी नवीन असली तरी, सत्ता माझ्यासाठी नवीन नाही. मी आजही मंत्रालयात जाताना छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो. मंत्रालयात आपला माणूस म्हणून माझे स्वागत करण्यात आले. 

सीमाभागातील नागरिकांना न्याय मिळवून देणार हे नक्की आहे. त्यासाठी कठोर पाऊले उचलणार आहे. गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकार कर्नाटक सरकारच्या बाजूने न्यायालयात प्रयत्न करत आहे, हे धक्कादायक आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.