80 टक्के विद्यार्थी लपवितात सायबर गुन्ह्यांची माहिती, वाचा काय आहे प्रकार

80 percent of students hide cyber crime information
80 percent of students hide cyber crime information

नागपूर : दिल्लीमधील "बॉईज लॉकर रूम' प्रकरणानंतर शाळकरी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सायबर क्राईमच्या विळख्यात सापडल्याचे चित्र आहे. राज्यात यापैकी 80 टक्के प्रकरणात विद्यार्थ्यांकडून कुठल्याच प्रकारची तक्रार करण्यात आलेली नाही. पोलिस तर सोडाच, पण विद्यार्थ्यांकडून या गोष्टीबद्दल पालकांनाही सांगण्यात येत नसल्याचा खुलासा एमएससीईआरटी, रिस्पॉसिबल नेटिजम तसेच सायबर स्पेस फाऊंडेशनच्या सर्वेक्षणात समोर आला आहे.

शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रेमसंबंधातून, ब्रेकअप वा मुलींकडून नकार आल्यास त्यांना धमकावून त्यांचे अश्‍लील व्हीडिओ वा फोटो टाकण्याची धमकी देण्याचे प्रकार बरेच उघडकीस आले आहेत.

साधाणरत: 14 ते 18 वयोगटातील मुले याला सर्वाधिक बळी पडताना दिसून येते. अशा प्रकारच्या "रिव्हेंज पॉर्न'मधूनच मुलामुलींच्या आयुष्यावर मोठा परिणाम होत असतो. दिल्लीतील "बॉईज लॉकर रूम' या इन्स्टाग्रामवरील अकाऊंटमधून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

याबाबत महाराष्ट्र स्टेट कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च ऍन्ड ट्रेनिंग (एमएससीईआरटी) यांच्या मदतीने "रिस्पॉसिबल नेटिजम' आणि "सायबर स्पेस फांउडेशन' यांच्या मदतीने ऑक्‍टोबर 2019 ते फेब्रुवारी 2020 यादरम्यान एक सर्वेक्षण केले. सर्वेक्षणात जवळपास 18 शाळांमध्ये शिकणाऱ्या 10 ते 17 वर्षातील 1 हजार 148 विद्यार्थ्यांना विविध प्रश्‍नावलीच्या माध्यमातून विचारणा करण्यात आली.

यामध्ये प्रामुख्याने संस्थांकडून विद्यार्थ्यांसोबत होणारी सायबर बुलींग, अकाऊंट हॅकींग, पॉर्न व्हीडिओ व फोटो पाठविणे यासारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश करण्यात आला.

सर्वेक्षणातून समोर आलेली माहिती

  • 80 टक्के विद्यार्थ्यांकडून तक्रार नाहीच
  • 33 टक्के विद्यार्थी लवकरच असे संदेश डिलिट करतात
  • 31 टक्के विद्यार्थी ते आपल्या मित्रांसोबत शेअर करतात.
  • 16 टक्केच विद्यार्थी या गोष्टी आपल्या पालकांसोबत शेअर करतात
  • 46 टक्के विद्यार्थी फोन, टॅबलेट आणि संगणकाशिवाय राहू शकत नाहीत
  • 37 टक्के विद्यार्थी कधी ना कधी अकाऊंट हॅकींग, सायबर बुलींग, ऑनलाइन धमक्‍या मिळणे आणि पॉर्न साहित्य पाठविण्याल्याचे बळी
  • सर्वाधिक विद्यार्थी व्हॉट्‌सऍप आणि टिकटॉक व्हीडिओ तयार करतात.
  • पब-जी आणि जीटीए यासारखे ऑनलाइन गेम खेळतात
     

"सायबर सेफ्टी हॅन्डबुक'

नववी ते बारावीतील विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने "सायबर सेफ्टी बुक' तयार केले. या बुकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारे "रिव्हेंज पॉर्न'याविरुद्ध "टिनेजर्स'मध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी बऱ्याच मुद्यांचा समावेश करण्यात आला आहे. या "हॅन्डबुक'मध्ये सायबर जागृतीवर आधारित अनेक मुद्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर मित्र निवडताना त्यांच्यासोबत आपले खासगी व्हीडिओ, फोटो शेअर करू नये. आपण नेमके कुणाशी बोलतो याबाबत घरचांनाही माहिती असणे व अनेक मुद्यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com