राज्यातील 865 जण "निगेटिव्ह' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 मार्च 2020

राज्यात गेल्या 52 दिवसांमध्ये ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने बारा शहरांमधील विलगीकरण कक्षात बुधवारपर्यंत 958 जणांना भरती करण्यात आले. त्यापैकी 865 जणांना कोरोना विषाणूंचा संसर्ग झाला नसल्याचे राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) स्पष्ट केले आहे.

पुणे - राज्यात गेल्या 52 दिवसांमध्ये ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने बारा शहरांमधील विलगीकरण कक्षात बुधवारपर्यंत 958 जणांना भरती करण्यात आले. त्यापैकी 865 जणांना कोरोना विषाणूंचा संसर्ग झाला नसल्याचे राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) स्पष्ट केले आहे. दरम्यान, राज्यात पुणे, पिंपरी चिंचवड आणि मुंबई येथे प्रत्येकी एका रुग्णाला संसर्ग झाल्याचे निदान झाले. त्यामुळे राज्यात कोरोनाचा संसर्गाच्या रुग्णांची संख्या 44 झाली आहे. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्यातील ही 32 वर्षीय महिला नेदरलॅंडवरून दुबईमार्गे पुण्यात आलेली आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला, अशी माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) आणि नवीन भोसरी रुग्णालयामधून 92 व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग विषाणूंकरिता घश्‍यातील द्रव्यांचे नमुने "एनआयव्ही'कडे तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी एक जणाचा अहवाल "पॉझिटिव्ह' आलेला असून उर्वरित चार व्यक्तींचे अहवाल "निगेटिव्ह' आले आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरामधील कोरोना या आजाराच्या रुग्णांची संख्या 11 झाली आहे. विलगीकरण केलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या एका व्यक्तीच्या संसर्गात आलेल्या आणखी एक रुग्ण मुंबई "पॉझिटिव्ह' आला. 

राज्यात 58 ठिकाणी संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत बाधित भागातून एक हजार 227 प्रवासी आले आहेत, अशी माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. 

नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येऊन त्यातील लक्षणे असणाऱ्या या प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे. बाधित भागातून राज्यात आलेल्या एक हजार 227 पैकी 442 प्रवाशांची 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. 

जिल्हा / महापालिका ............. रुग्ण 
पिंपरी चिंचवड मनपा ................. 11 
पुणे मनपा ..............................8 
मुंबई ................................... 8 
नागपूर ...................................4 
यवतमाळ, नवी मुंबई, कल्याण प्रत्येकी..... 3 
रायगड, ठाणे, नगर, औरंगाबाद प्रत्येकी .... 1 

दृष्टिक्षेपात पुण्यातील कोरोना 
दाखल रुग्ण ......... 330 
घेतलेले नमुने ....... 330 
"निगेटिव्ह' अहवाल ... 305 
"पॉझिटिव्ह' अहवाल... 8 

कोरोना व्हायरस


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 865 people have not been infected with corona virus in the Maharashtra