Vidhan Sabha 2019 : राज्यात मोदींच्या 9 तर शहांच्या 18 सभा होणार

वृत्तसंस्था
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नावाचा समावेश आहे.

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नावाचा समावेश आहे. त्यानंतर आता महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यात मोदींच्या 9 तर अमित शहांच्या 18 सभा होणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. 

विधानसभा निडणुकीसाठी येत्या 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. यामध्ये नरेंद्र मोदी यांची राज्यात 9 सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. यांपैकी 17 ऑक्टोबरला पुणे आणि सातारा येथे मोदींची सभा होणार आहे. त्याचबरोबर राज्यातील इतर ठिकाणी सभांचे नियोजन सध्या सुरू आहे. याशिवाय पुण्यातील सभेच्या जागेचा शोधही सुरू असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

Navratri Festival 2019 : महालक्ष्मीचं देणं, हळदी - कुंकवाचं लेणं ! (व्हिडिओ)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 9 Election Rally of Narendra Modi and 18 of Amit Shah in Maharashtra says Chandrakant Patil