Navratri Festival 2019 : महालक्ष्मीचं देणं, हळदी - कुंकवाचं लेणं ! (व्हिडिओ)

अर्चना बनगे
Sunday, 6 October 2019

कोल्हापूर - उत्सवाच्या काळात मोठे महत्त्व असलेल्या कुंकू ला सध्या बाजारात मोठी मागणी वाढू लागली आहे. अधिक रंगणाऱ्या कुंकू ला सध्या मोठी मागणी असली तरी अनेक महिला आता त्यातील शास्त्र सुद्धा जाणून घेऊन हळदी पासून तयार झालेल्या कुंकू ला व श्री कुंकू ला अधिक मागणी करू लागले आहेत.

कोल्हापूर - उत्सवाच्या काळात मोठे महत्त्व असलेल्या कुंकू ला सध्या बाजारात मोठी मागणी वाढू लागली आहे. अधिक रंगणाऱ्या कुंकूला सध्या मोठी मागणी असली तरी अनेक महिला आता त्यातील शास्त्र सुद्धा जाणून घेऊन हळदीपासून तयार झालेल्या कुंकूला व श्री कुंकूला अधिक मागणी करू लागले आहेत.

बाजारपेठेत सध्या तीन प्रकारचे कुंकू असून यातील साधी कुंकू हे दराने कमी असल्याने त्याची मागणी अधिक आहे. भारतीय संस्कृतीत मोठे महत्त्व आहे ठिकाणी देवस्थानच्या ठिकाणी हळद आणि कुंकू ची मोठी उलाढाल होत असते विशेषतः देवी ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी कुंकू सह अन्य पूजेच्या साहित्याला मोठी मागणी असते.

सध्या बाजारपेठेत कुंकूचे तीन प्रकार आहेत यामध्ये शादी कुंकू हळदीचे कुंकू आणि स्त्री कुंकू असे प्रकार विक्रीसाठी आहेत. साधी कुंकू हे दिसायला अधिक लाल भडक असते. त्यामुळेच लोकांच्या कडून आणि भाविकांच्या कडून या कुंकू ला मागणी असते मात्र दैनंदिन वापरासाठी हे कुंकू अनेक वेळा अनेक त्यांना हानीकारक ठरते. त्यामुळे विक्रेते अनेक वेळा भाविक आणि महिलांना साध्या कुंकू ऐवजी हळदीचे कुंकू घेण्याची शिफारस करतात. हळदीचे कुंकू दर साध्या कुंकू च्या दराच्या तुलनेत  अधिक  आहे. त्यामुळे काही भाविक हे कुंकू घेण्याचे टाळतात.

हळदीपासून बनवलेले कुंकू सर्वात महत्त्वाचा आहे औषध म्हणून सुद्धा हळदीचा उपयोग आहे. श्री कुंकू हे आयुर्वेदिक घटक वापरून तयार करण्यात येते हे कुंकू सुद्धा शुद्ध असते.देवीच्या शास्त्राप्रमाणे हे कुंकू तयार केलेले असतात. अशा कुंकू ला ही अलीकडच्या काळात मोठी मागणी वाढली आहे.

असे तयार करा कुंकू
हळकुंड उन्हात कडकडून भाजून घ्यावे . त्यामध्ये  लिंबू घातल्यानंतर  कुंकू तयार होते . काहीजण चुनखडी वापरून हळदीपासून कुंकू तयार करतात कुंकू आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. अपायकारक वस्तू पासून तयार केलेले कुंकू स्वस्त मात्र ते वापरल्यानंतर महिलाना त्रासदायक ठरते.

कुंकु वापरण्यामागे शास्त्रशुद्ध कारण आहे. आपण ज्या ठिकाणी कुंकू लावतो त्या ठिकाणी दोन नाड्या एकत्र आलेले असतात त्यावर हळद आणि चुनखडीचा प्रभाव पडून मन अधिक प्रसन्न होते. त्याचबरोबर दिवाळीसाठी तयार केलेले कुंकू अनेक नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले असते.
- सुहास जोशी, 
वेदशास्त्रसंपन्न (पुजारी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navratri Festival 2019 Kumkam special story