esakal | ST चे 90 टक्के कर्मचारी कोरोना मुक्त, रोजच्या बाधितांच्या संख्येतही घट
sakal

बोलून बातमी शोधा

ST चे 90 टक्के कर्मचारी कोरोना मुक्त, रोजच्या बाधितांच्या संख्येतही घट

17 डिसेंबर पर्यंत 3330 कर्मचारी बरे झाले असून कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन बाधितांच्या संख्येतही घट झाल्याचे एसटी महामंडळाने सांगितले आहे.

ST चे 90 टक्के कर्मचारी कोरोना मुक्त, रोजच्या बाधितांच्या संख्येतही घट

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई: कोरोना काळात मुंबईसह राज्यभरात अत्यावश्यक सेवेत कर्तव्य बजावताना आतापर्यंत 3731 एसटी कर्मचारी कोरोना बाधित झाले आहे. तर 99 कर्मचाऱ्यांचा मृत्यू सुद्धा झाला आहे. मात्र आता एकूण बाधित कर्मचाऱ्यांच्या संख्येत 90 टक्के कर्मचारी आता उपचार घेऊन घरी परतले आहे. 17 डिसेंबर पर्यंत 3330 कर्मचारी बरे झाले असून कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन बाधितांच्या संख्येतही घट झाल्याचे एसटी महामंडळाने सांगितले आहे.

कोरोनाची महामारीमुळे सुरुवातीला राज्य सरकारने सार्वजनिक प्रवासी वाहतूक बंद केली होती. रेल्वे, खासगी बस, एसटी, टॅक्सी, रिक्षा अशा सर्व प्रकारच्या सार्वजनिक वाहतूक बंद होत्या. त्यामुळे अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची अडचण होऊ नये म्हणून एसटीवर अत्यावश्यक कर्मचाऱ्यांच्या प्रवासाची जबाबदारी दिली होती. त्यासाठी राज्यभरातील कर्मचाऱ्यांना मुंबईत कर्तव्यावर बोलविण्यात आले होते. दरम्यान अनेकांना कोरोनाची बाधा झाली.

यादरम्यान काही कर्मचाऱ्यांचा कर्तव्यावरच कोरोनाची बाधा किंवा आजारपणामुळे मृत्यू सुद्धा झालेत. त्याशिवाय इतर विभागातील कर्मचारी मोठ्या प्रमाणात बाधित सुद्धा झाले होते. ज्याचा विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू होता. 17 डिसेंबरपर्यंत सुमारे 3731 कर्मचारी बाधित झाले असून, आता त्यापैकी 90 टक्के कर्मचारी बरे झाल्याचा दिलासा एसटी महामंडळाने व्यक्त केला आहे. त्यासोबतच दैनंदिन वाढणारी बाधितांच्या संख्येतही घट झाली असून, 17 डिसेंबरला फक्त जळगाव विभागात एक कर्मचारी बाधित झाल्याचे आढळून आले आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
 
99 कर्मचाऱ्यांचा मृत्यू

कर्तव्य बजावताना कोरोनाची बाधा होऊन 17 डिसेंबरपर्यंत सुमारे 99 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वात जास्त ठाणे विभागातील कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला असून त्याखालोखाल नाशिक, जळगाव, पुणे, सांगली, कोल्हापूर या विभागातही मृत कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे.

हेही वाचा- मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या भूमिकेवर ठाम
 

302 कर्मचाऱ्यांचा उपचार सुरू

सध्या 302 कर्मचारी अद्याप बाधित असून, त्यांचा विविध विभागातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे.  यामध्ये सर्वात जास्त सिंधुदुर्ग, सातारा, परभणी, अहमदनगर, सांगली, बीड, नांदेड, नाशिक, ठाणे या विभागातील कर्मचारी आहे.

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

90 percent ST employees corona free reduction number of daily patients

loading image