esakal | राज्यात ९७.३६ टक्के रुग्ण कोरोनामुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

corona

राज्यात ९७.३६ टक्के रुग्ण कोरोनामुक्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यात गेल्या दीड वर्षांमधील सर्वाधिक कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण मंगळवारी आरोग्य खात्याच्या दफ्तरी नोंदले. राज्यातील ९७.३६ टक्के रुग्ण आज कोरोनामुक्त झाले. कोरोनाच्या दोन लाटांचा महाराष्ट्राने अनुभवल्या आहेत. त्यात पहिल्यापेक्षा दुसऱ्या लाटेची तीव्रता खूप जास्त होती. या पार्श्वभूमिवर ही आशादायक माहिती आरोग्य खात्याने दिली.

राज्यातील खूप मोठ्या लोकसंख्येला कोरोनाचा संसर्ग झाला. त्यानंतर लस घेणाऱ्या नागरिकांची संख्याही वेगाने वाढत आहे. यामुळे कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण कमी होत आहे. मागच्या तीन महिन्यांपासून कोरोनाच्या विषाणूंमध्ये बदल झाल्याचे दिसून आले नाही, असे निरीक्षण सार्वजनिक आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी नोंदविले.

पुण्यासह राज्याच्या विविध भागांमध्ये सध्या ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण दिसतात. पण, त्यापैकी खूप कमी लोकांना कोरोनाचे निदान होत आहे. त्यातील काही रुग्णांना इन्फ्लूएंझासारख्या विषाणूंचा संसर्ग झाल्याचा प्रयोगशाळा तपासण्यांमधून स्पष्ट होते. सर्वसाधारणतः एका विषाणूंचा हवेत संसर्ग सुरू असताना इतर विषाणूंचा प्रादूर्भाव होत नाही. आता इतर विषाणूंचा संसर्ग होत असल्याने कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याचे निष्कर्ष निघतो. पण, याचा अर्थ आपण बिनधास्त झालो असा निश्चित नाही. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना आपण घेतल्याच पाहिजे, असेही डॉ. आवटे यांनी सांगितले.

"नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. तसेच, असलेले रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. त्यामुळे रुग्ण कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे."

-प्रदीप आवटे, आरोग्य खात्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी

असे झाले प्रमाण कमी

  • १२ जानेवारी - ९४.७७

  • १२ फेब्रुवारी - ९५.९१

  • १२ मार्च - ९२.७९

  • १२ एप्रिल - ८१.९४

  • १२ मे - ८८.०१

  • १२ जून - ९५.४८

  • १२ जुलै - ९६.१५

  • १२ ऑगस्ट - ९६.८६

  • १२ सप्टेंबर - ९७.०४

  • १२ ऑक्टोबर - ९७.३६

loading image
go to top