‘शालार्थ आयडी’साठी शिक्षण उपसंचालक कार्यालयातच घेतली १ लाखाची लाच! सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरील शिक्षण उपनिरीक्षक रंगेहाथ पकडला, वाचा सविस्तर...

सोलापूर जिल्ह्यात एका माध्यमिक शाळेतील सहशिक्षिका २०१६ पासून विनावेतन काम करत आहेत. त्यांचा शालार्थ आयडी मंजूर झाल्यानंतर त्यांना वेतन चालू होणार होते. तो शालार्थ आयडी देण्यासाठी पुण्याच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयातील उपनिरीक्षक रावसाहेब मिरगणे (वय ५७) याने एक लाखाची लाच मागितली होती.
anti corruption
anti corruptionsakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात एका माध्यमिक शाळेतील सहशिक्षिका २०१६ पासून विनावेतन काम करत आहेत. त्यांचा शालार्थ आयडी मंजूर झाल्यानंतर त्यांना वेतन चालू होणार होते. तो शालार्थ आयडी देण्यासाठी पुण्याच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयातील उपनिरीक्षक रावसाहेब मिरगणे (वय ५७) याने एक लाखाची लाच मागितली होती. ती रक्कम स्वत:च्या कार्यालयात स्विकारताना त्याला पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने कार्यालयातच रंगेहाथ पकडले. त्याला अटक करण्यात आली असून उद्या (बुधवारी) न्यायालयात हजर केले जाणार आहे. सेवानिवृत्तीला एक वर्षच बाकी असताना मिरगणे लाचेच्या जाळ्यात अडकला आहे.

तक्रारदाराच्या पत्नीचा शालार्थ आयडीचा प्रस्ताव १६ जून रोजी शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत पुण्याच्या विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाला पाठविला होता. हा प्रस्ताव ‘ई- ऑफिस’ प्रणालीतून विभागीय शिक्षण उपसंचालकांना सादर करण्यासाठी व तो मंजूर करून देण्यासाठी उपसंचालक कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षक रावसाहेब मिरगणे याने संबंधित शिक्षिकेकडे लाचेची मागणी केली होती. १७ नोव्हेंबरला पैशाची मागणी केली होती. त्यानंतर २१ नोव्हेंबर रोजी तडजोडीअंती एक लाख रुपये द्यायचे ठरले.

त्या शिक्षिकेच्या पतीने यासंदर्भात पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दिली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी लाचेची मागणी केल्यासंदर्भात पडताळणी केली. शुक्रवारी (ता. २१) मागितलेली लाच आज मंगळवारी देण्याचे ठरले होते. त्यानुसार लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी सापळा लावला होता. त्यात मिरगणे अलगद अडकला. पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले आणि अटक केली.

कार्यालयातच स्विकारली लाचेची रक्कम

शिक्षण उपनिरीक्षक रावसाहेब मिरगणे (वय ५७) याने शालार्थ आयडी देण्यासाठी लाच मागितली होती. मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्याने ती रक्कम शिक्षण उपसंचालक कार्यालयातील स्वतःच्या केबिनमध्ये पंचासमक्ष स्वीकारली. त्यावेळी त्याला अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. दुसऱ्या पथकाने त्याच्या घराची झडती घेतली. त्यावेळी बरेच काही सापडल्याचेही सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Taekwondo Player Raises Bribe Allegation Before CM Says Officer Demanded Rs 1.5 Lakh Administration Clarifies Case
Court
Farmhouse Hideout Ends in Arrest Nashik Police Tighten Probe Into Rs 160 Crore Shalarth Scam Case
anti corruption buro, solapur
Marathi News Esakal
www.esakal.com