
Mumbai Crime : ग्रँट रोड परिसरात माथेफिरुचा पाच जणांवर चाकूहल्ला; तिघांचा मृत्यू
मुंबईः ग्रँट रोड परिसरात माथेफिरुने चाकूहल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये तिघांचा मृत्यू झालाय.
ग्रँट रोड हा मुंबईतला अत्यंत गर्दीचा गजबजलेला परिसर आहे. येथे राहणारा चेतन गाला (वय ५४) हा व्यक्ती अचानक वार करीत सुटला. त्याने निर्घूणपणे पाच जणांवर हल्ला केला. या घटनेमध्ये सुरुवातीला दोघांचा मृत्यू झाला होता. रात्री साडेआठ वाजता एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे.
आज शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता ही घटना घडली आहे. चेतनचे पत्नीसोबत वाद होत होते. त्यामुळे त्याचा शेजाऱ्यांवर राग होता. शेजारी पत्नीला फूस लावतात, असा त्याला संशय होता.
त्यामुळे त्याने रागाच्या भरात शेजाऱ्यावर हल्ला केला. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. तिघे चेतन गाला फरार होण्याच्या प्रयत्नात होता. परंतु पोलिसांना त्याला ताब्यात घेतलं आहे.
ग्रँट रोड परिसरातील पार्वती हवेली येथे ही घटना घडली आहे. इमारतीचा दुसरा मजला सील करण्यात आला आहे. तपासासाठी फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे.
घटनाक्रम
ग्रँट रोड परिसरात डॉ.दा.भ. मार्ग पोलीस ठाणेच्या हधीत पार्वती मेन्शन बिल्डींग, येथे चेतन गाला आरोपीने शुक्रवारी दुपारी 3.30 वाजण्याचे सुमारास चाकूने शेजारी राहणाऱ्यावर प्राणघातक हल्ला केला. या घटनेत एकूण 5 व्यक्ती गंभीर जखमी झाल्या असून त्यांना एच.एन. रिलायन्स हॉस्पीटल तसेच नायर रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपीला अटक करण्यात आली.
कौटुंबिक वादातून हल्ला
चेतन गाला याचे कुटुंबीयांशी असलेल्या वादामुळे कुटुंबीय चेतन गाला पासून दूर झाले होते. या मागे त्याच्या शेजाऱ्यांनी कुटुंबियाना भडकवल्याचा संशय चेतनच्या मनात होता. त्याच कारणाने तो मानसिक तणावात होता. याच रागातून शुक्रवारी शेजारील घरात जात कुटुंबातील सदस्यांवर गालाने हल्ला केला. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर गिरगावातील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी चेतन गाला याला अटक केली. त्याच्यावर कलम 302 नुसार डीबी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.