esakal | राज्यातील 57 टक्के विद्यार्थ्यांचेच आधार अपडेट 
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यातील 57 टक्के विद्यार्थ्यांचेच आधार अपडेट 

राज्यातील विद्यार्थ्यांची आधार कार्ड अपडेटची स्थिती 
एकूण विद्यार्थी संख्या ः 2 कोटी 17 लाख 25 हजार 994 
आधार अपलोड केलेले विद्यार्थी ः एक कोटी 24 लाख 55 हजार 169 
आधार अपलोड करण्याचे राहिलेले विद्यार्थी ः 92 लाख 70 हजार 825 
आधार अपलोडची टक्केवारी ः 57.33 टक्के 

राज्यातील 57 टक्के विद्यार्थ्यांचेच आधार अपडेट 

sakal_logo
By
संतोष सिरसट

सोलापूर ः शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड स्टुडंट्‌स पोर्टलवर अपडेट करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. अनेकदा सांगूनही अद्याप केवळ 57 टक्के विद्यार्थ्यांचेच आधार कार्ड अपडेट झाले आहेत. उर्वरीत विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करण्याच्या सूचना शिक्षण संचालकांनी दिल्या आहेत. आधार कार्ड अपडेट करण्यामध्ये नाशिक विभाग आघाडीवर तर मुंबई विभाग पिछाडीवर आहे. 

राज्यातील विद्यार्थ्यांचे आधार कार्ड स्टुडंट्‌स पोर्टलवर अपडेट करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी आधार कार्ड काढले आहे, त्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड संबंधित शाळांनी स्टुडंट्‌स पोर्टलवर अपडेट करायचे आहे. ती जबाबदारी संबंधित शाळांची आहे. असे असताना शाळाही काही प्रमाणात त्याकडे दुर्लक्ष करतात. ज्या विद्यार्थ्यांनी आधार कार्ड काढले नाही, त्याची यादी संबंधित शाळांनी तयार करायची आहे. सध्या राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी आधार कार्ड काढले नाही त्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड जवळच्या महा-इ-सेवा केंद्रावर जाऊन काढायचे आहे. विद्यार्थ्यांनी आधार कार्ड काढल्यानंतर संबंधित शाळांनी ते स्टुडंट्‌स पोर्टलवर अपडेट करायचे आहे. आधार कार्ड व विद्यार्थी संख्या याचा थेट संबंध शिक्षकांच्या सेवक संचाशी जोडला गेला आहे. त्यामुळे आधार कार्ड अपडेट करणे क्रमप्राप्त आहे. लॉकडाऊन शिथिल होण्यापूर्वी शाळांनी आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांची यादी तयार करुन ठेवायची आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढायचे आहे. शाळेत शिक्षण घेणाऱ्या सगळ्याच विद्यार्थ्यांचे आधार कार्ड स्टुडंट्‌स पोर्टलवर अपडेट असणे आवश्‍यक असल्याचे प्राथमिकचे शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप व माध्यमिकचे शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी राज्यातील सगळ्या शिक्षणाधिकाऱ्यांना सांगितले आहे. 

आधार अपलोडची विभागनिहाय टक्केवारी 
मुंबई उपनगर ः 49.60 टक्के 
मुंबई विभाग ः 44.49 टक्के 
पुणे विभाग ः 57.94 टक्के 
कोल्हापूर विभाग ः 67.28 टक्के 
नाशिक विभाग ः 73.80 टक्के 
औरंगाबाद विभाग ः 50.61 टक्के 
लातूर विभाग ः 54.42 टक्के 
अमरावती विभाग ः 60.60 टक्के 
नागपूर विभाग ः 61.33 टक्के