Aaditya Thackeray: 'हो आहे मी पप्पू पण...''आदित्य ठाकरेंचं विरोधकांना प्रत्युत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aaditya Thackeray

Aaditya Thackeray: 'हो आहे मी पप्पू पण...''आदित्य ठाकरेंचं विरोधकांना प्रत्युत्तर

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना गटातील नेत्यांमध्ये राजीनाम्याच्या मागणीवरून चांगलाच कलगीतुरा रंगली आहे. 'मला पप्पू म्हणताय. मी राजीनामा देतो तुम्ही चाळीस लोक राजीनामा द्या मग पाहू कोण गद्दार आहेत' असं ओपन चॅलेंजच आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाला दिलं आहे. तसेच यावेळी त्यांनी हो आहे मी पप्पू असं म्हणत विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे.(Aaditya Thackeray Abdul Sattar Chota Pappu Remark maharashtra politics)

अकोला जिल्ह्यातील बाळापुर शहरात आयोजित सभेत आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला.

'आमच्या पाठीत जो खंजीर खुपसला तोच खंजीर जनतेच्या पाठीत खुपसत आहेत. ह्याच्या खुर्च्या चिकटलेल्या आहेत, सोडायला तयार नाहीत. सगळे गद्दार आहेत, ते गद्दार म्हणूनच राहणार आहे.

कृषिमंत्री, उद्योग मंत्र्यांसह 40 आमदार हे गद्दार आहे. मी असेल छोटा पप्पू, पण महाराष्ट्राच्या जनतेशी प्रामाणिक राहा. आपल्या राज्यात खूप झाले बंटी बबली झाले आहे,'' असा टोलाही आदित्य ठाकरेंनी अब्दुल सत्तार यांना लगावला आहे.

तसेच, पन्नास खोके घेणाऱ्या 40 आमदारांना राज्यात तोंड दाखवने मुश्किल झाले आहे. लग्नात गेल्यावर नातेवाईक व नागरिक विचारणा करीत असल्याने गद्दारांची मोठी अडचण झाली आहे. अतिवृष्टि झाल्यावरही शेतकरी बांधवांना आर्थिक मदत नाही. जनतेला राज्याचे कृषीमंत्री कोण, हे माहीत नाही. कृषीमंत्री राज्यात फिरकलेच नाहीत, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली.

अब्दुल सत्तार काय म्हणाले?

‘टाटा एअरबस’ निर्मिती प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर टीकास्र सोडलं आहे. यावर बोलताना अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंचा ‘छोटा पप्पू’ असा उल्लेख केला होता. छोटा पप्पू आत्ता जे बोलतोय, ते जर आधी बोलले असते, तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती”, असे सत्तार त्यावेळी म्हणाले होते.