
'मनसेने भोंगे लावल्यास त्यावरुन वाढत्या महागाईविषयी जनतेला माहिती द्यावी'
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेवर टीका होत आहे. ठाण्यातील उत्तरसभेत ठाकरे यांनी सदरील भूमिकेवर ठाम असल्याचे पुन्हा एकदा सांगितले. यावरच राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी टीका केली आहे. यावर मला टिप्पणी करायची नाही. मात्र मनसेने भोंगे लावल्यास त्यावरुन वाढत्या महागाईविषयी जनतेला माहिती द्यावी. पेट्रोल-डिझेल, सीएनजी आणि इतर गोष्टींची दरवाढ कशामुळे झाली, हे मनसेने (MNS) सांगावे, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी मनसेला केला. (Aaditya Thackeray Criticize MNS For Mosque Loud Speaker)
हेही वाचा: हा पठ्ठ्या नसता तर तो दिल्लीत गेला नसता, गुलाबराव पाटलांचा खासदारांना टोला
मुंबईत आज गुरुवारी (ता.१४) प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. साठ वर्षांपूर्वीचा इतिहास न सांगता गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये काय झाले, ते सांगावे, असे आवाहन आदित्य यांनी मनसेला केले. भोंग्याचे प्रकरण राज्यात चांगलेच तापले आहे. काहींनी मनसेच्या भूमिकेला विरोध केला आहे.
हेही वाचा: अमेरिकेत कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या-तिसऱ्या टप्प्यातील चाचणीवर बंदी
राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग उतरवण्याची ३ मे ही शेवटची तारीख दिली आहे. भोंगे न उतरवल्यास हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन त्यांनी गुढीपाडवा मेळावा आणि काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या ठाण्यातील उत्तरसभेतही पुनरुच्चार केला होता.
Web Title: Aaditya Thackeray Criticize Mns For Mosque Loud Speaker
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..