Wed, March 29, 2023

Aaditya Thackeray : मराठवाडा दौऱ्यादरम्यान सभेत पुन्हा हल्ला होण्याची शक्यता
Aaditya Thackeray : मराठवाडा दौऱ्यादरम्यान सभेत पुन्हा हल्ला होण्याची शक्यता
Published on : 9 February 2023, 9:51 am
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या काल जालन्यातल्या सभेमध्ये गोंधळ झाला. आता पुन्हा एकदा सभेत हल्ला होण्याची शक्यता आहे. नीलम गोऱ्हे यांनी ही माहिती दिली आहे.
माध्यमांशी बोलताना नीलम गोऱ्हे यांनी ही माहिती दिली आहे. स्थानिक पोलिसांशी संवाद साधताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या, "आदित्य ठाकरेंचा मराठवाडा दौरा सुरू आहे. त्यांच्या दौऱ्यात दगडफेकीसारखा प्रकार घडला. आजही पोलिसांना तशी माहिती होती. मी यात लक्ष घातलं आहे. पोलिसांशी मी बोलले आहे. आजही सभेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न सुरू आहे."
नीलम गोऱ्हे पुढे म्हणाल्या, "पोलिसांचं लक्ष सगळीकडे पाहिजे. पोलिसांनी पुरेसा बंदोबस्त पुरवला नाही. धमक्यांच्या संदर्भामध्ये काहीच पाऊल उचललं गेलं नाही."