Aaditya Thackeray : 'अन् 20 मे रोजी शिंदेंना घरी बोलावलं होतं...' आदित्यंनी सांगितला किस्सा

Aaditya Thackeray
Aaditya Thackeray esakal

मुंबईः ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी काही वेळापूर्वीच माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत 'त्या' दिवशी नेमकी काय चर्चा झाली होती यासंदर्भात माहिती दिली आहे.

'भाजपमध्ये गेलो नाही तर मला जेलमध्ये टाकतील असं म्हणत मातोश्री या निवास्थानी येऊन एकनाथ शिंदे अक्षरश: रडले होते, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.

Aaditya Thackeray
Eknath Shinde : 2014 मध्येच एकनाथ शिंदे झाले होते नॉट रिचेबल; 'योद्धा कर्मयोगी..' पुस्तकातून गौप्यस्फोट

त्यातच आता आदित्य यांनी २० तारखेला नेमकं काय झालं, याचा खुलासा केला आहे. ते माध्यमांशी बोलतांना म्हणाले की, २० मे रोजी शिंदेंना घरी बोलावलं होतं. कानावर बंडाबाबत चर्चा येत होत्या. जे कानावर आलं ते खरंय का? गद्दारी का करत आहात? असं विचारण्यात आलं. त्यावर शिंदे म्हणाले की, दबाव आहे. परंतु बंड करणार नाही. मात्र त्यांनी जे करायचं ते केलंच. असं आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरेंच्या विधानानंतर प्रतिक्रिया

आदित्य ठाकरे यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते माध्यमांशी बोलताना म्हणाले की, आदित्य ठाकरेंकडे कुठे लक्ष देता, ते जाऊ द्या रे. ते लहान आहेत. दोन शब्दात त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

त्याचबरोबर भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही आदित्य ठाकरे बालिश असल्याची टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या प्रश्नाला मी अजिबात उत्तर देणार नाही. कोण आदित्य ठाकरे? कोण आहेत तो? काय आहे त्याला प्रतिष्ठा? बालिश आहे तो. एकनाथ शिंदे भाजपसोबत नाही गेले. ते शिवसेना पक्ष घेऊन आले, असं राणे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com