esakal | आदित्य ठाकरे, महाविकास आघाडीच्या कॅबिनेटमधील सर्वात तरुण चेहरा !
sakal

बोलून बातमी शोधा

आदित्य ठाकरे, महाविकास आघाडीच्या कॅबिनेटमधील सर्वात तरुण चेहरा !

आदित्य ठाकरे, महाविकास आघाडीच्या कॅबिनेटमधील सर्वात तरुण चेहरा !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा, मुंबई

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे. यंदा पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरली. मुंबईच्या वरळीतून आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवली आणि मोठ्या मताधिक्याने आदित्य ठाकरे जिंकून आलेत. 

सध्याच्या मंत्रिमंडळात सर्वात तरुण नेता म्हणून आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहिलं जातंय. मुंबईचे प्रश्न असतील, तरुणांचे प्रश्न असतील आदित्य ठाकरे यांनी कायमच युवा सेनेच्या माध्यमातून यावर आवाज उठवलेला पाहायला मिळालाय. पर्यावरण वाचवण्यावर आदित्य ठाकरे यांचा सुरवातीपासून भर राहिलाय. 

मोठी बातमी :  'राऊत' नाराज; शिवसेनेत नाराजी नाट्य शिगेला..    

मुंबईतील मेट्रो कारशेडचा प्रश्न, आरे प्रश्नावर सुरवातीपासून आदित्य ठाकरे यांनी आवाज उठवला आहे. फडणवीस सरकारच्या काळात देखील प्लास्टिक बंदी करण्यात यावी ही कल्पना आदित्य ठाकरे यांचीच होती. 

मुंबईतील नाईट लाईफ असो किंवा ओपन जिम, तरुणांशी निगडीत प्रश्न घेऊन आदित्य ठाकरे कायम सर्वांसमोर येताना पाहायला मिळालेत. नाईट लाईफबद्दल आदित्य यांना विरोध देखील झाला. मात्र तरीदेखील आदित्य ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम राहिलेत. 

महाराष्ट्रातील जनतेचे सर्व प्रश्न सोडवण्यावर आदित्य ठाकरे काम करणार असल्याचं आदित्य ठाकरे म्हणालेत.  

मोठी बातमी : कामगार ट्रेड युनियन ते कॅबिनेट मंत्री, असा राहिला अनिल परब यांचा प्रवास

दरम्यान, आज आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्या शपथविधी आधी नाराजी नाट्य देखील पाहायला मिळालं. आमदार तानाजी सावंत यांचा पत्ता कट करत आदित्य ठाकरे यांची मंत्रीपदावर वर्णी लागलीये. मात्र महाराष्ट्र खूप मोठा आहे, प्रत्येकाला काहीना काही जबाबदारी दिली जाईल असं आदित्य ठाकरे म्हणालेत. 

WebTitle : aaditya thackeray took oath as cabinet minister of maharashtra as youngest minister