Political News : महाराष्ट्रातील पोटनिवडणुकीबाबत संभाजी ब्रिगेडनंतर 'या' पक्षानं घेतला मोठा निर्णय!

अर्ज मागं घेण्याकरिता अवघे काही तास उरले आहेत, त्यामुळं पुण्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय.
Kasba Peth and Pimpri Chinchwad Assembly By-election
Kasba Peth and Pimpri Chinchwad Assembly By-electionesakal

पुणे : कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Kasba Peth and Pimpri Chinchwad Assembly By-election) अर्ज मागं घेण्याकरिता अवघे काही तास उरले आहेत, त्यामुळं पुण्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. या निवडणुकीतून संभाजी ब्रिगेडनं याआधी माघार घेतलीये.

Kasba Peth and Pimpri Chinchwad Assembly By-election
Good News : आता चीनची दादागिरी संपणार; भारतात पहिल्यांदाच सापडला 'हा' मोठा खजिना

आता आम आदमी पार्टीनं (Aam Aadmi Party) देखील महाराष्ट्रातील विधानसभा पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार, किरण कद्रे यांनी कसबा विधानसभा निवडणुकीतून माघार घेतलीये, अशी घोषणा पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्ता प्रीती शर्मा मेनन (Preeti Sharma Menon) यांनी केली.

Kasba Peth and Pimpri Chinchwad Assembly By-election
Mukesh Ambani : Reliance समूह प्रत्येक गावात 5G सेवा, JIO शाळा सुरु करणार; अंबानींची मोठी घोषणा

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा व विधानसभांची निवडणूक पूर्ण ताकतीनिशी लढण्याचा निर्धारही मेनन यांनी केलाय. याआधी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि आमदार सचिन अहिर यांच्या शिष्टाईनंतर संभाजी ब्रिगेडच्या उमेदवारांनी अर्ज मागं घेण्यास होकार दर्शविला आहे. त्यामुळं महाविकास आघाडीला मोठा दिलासा मिळालाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com