Good News : आता चीनची दादागिरी संपणार; भारतात पहिल्यांदाच सापडला 'हा' मोठा खजिना

देशात पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये 59 लाख टन लिथियमचा (Lithium) साठा सापडला आहे.
59 lakh tonnes of lithium reserves were found in Jammu
59 lakh tonnes of lithium reserves were found in Jammuesakal
Summary

लिथियम आणि सोन्यासह 51 खनिज ब्लॉक संबंधित राज्य सरकारांना सुपूर्द करण्यात आल्याची माहिती सरकारनं दिली आहे.

श्रीनगर : देशात पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये 59 लाख टन लिथियमचा (Lithium) साठा सापडला आहे. केंद्र सरकारनं गुरुवारी ही माहिती दिली. आता भारताचा स्वतःचा असा साठा आहे, त्यामुळं चीनचं वर्चस्व संपणार आहे.

हा साठा जम्मू-काश्मीरमध्ये सापडल्याची माहिती केंद्रानं दिली. विशेष बाब म्हणजे, लिथियम हा नॉन-फेरस धातू आहे आणि तो ईव्ही बॅटरीच्या आवश्यक घटकांपैकी एक आहे. खाण मंत्रालयानं सांगितलं की, 'भारतीय भूगर्भीय सर्वेक्षणाला प्रथमच जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील सलाल-हैमाना इथं 5.9 दशलक्ष टन लिथियम अनुमानित संसाधनं (G3) सापडली आहेत.

59 lakh tonnes of lithium reserves were found in Jammu
Pravin Togadia : मशिदींवरील भोंग्यावरुन हिंदू परिषदेच्या अध्यक्षानं राज ठाकरेंना डिवचलं; म्हणाले, आता कुठं गेलं..

लिथियम आणि सोन्यासह 51 खनिज ब्लॉक संबंधित राज्य सरकारांना सुपूर्द करण्यात आल्याची माहिती सरकारनं दिली आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 'या 51 खनिज ब्लॉकपैकी 5 ब्लॉक सोनं आणि इतर पोटॅश, मॉलिब्डेनम, बेस मेटल इत्यादींशी संबंधित आहेत, जे जम्मू आणि काश्मीर, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान, तामिळनाडू आणि तेलंगणा इथं आहे.

59 lakh tonnes of lithium reserves were found in Jammu
Gurgaon Court : 'या' बड्या पत्रकाराविरुध्द अजामीनपात्र वॉरंट जारी; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता!

Lithium Reserves Found याशिवाय 7897 दशलक्ष टन कोळसा आणि लिग्नाइटचे 17 अहवाल कोळसा मंत्रालयाला देण्यात आले आहेत. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणानं धोरणात्मक आणि महत्त्वाच्या खनिजांवर 115 प्रकल्प तयार केले आहेत. त्याचबरोबर खत खनिजांसाठी 16 प्रकल्प तयार करण्यात आले आहेत. रेल्वेला मदत करण्यासाठी कोळशाचे साठे शोधण्यासाठी 1851 मध्ये GSI सुरू करण्यात आले. तथापि, 200 हून अधिक वर्षांच्या प्रवासात, GSI भूविज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. यासोबतच याला जिओ सायंटिफिक ऑर्गनायझेशनचा दर्जाही मिळाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com