esakal | वंचितची ताकद वाढणार; आणखी एक मोठा पक्ष सोबत येणार
sakal

बोलून बातमी शोधा

वंचितची ताकद वाढणार; आणखी एक मोठा पक्ष सोबत येणार

वंचितची ताकद वाढणार; आणखी एक मोठा पक्ष सोबत येणार

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने राज्यात आपली ताकद दाखवली होती. प्रकाश आंबेडकर आणि हैदराबादच्या ओवैसी बंधू यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने आता विधानसभा निवडणुकांसाठीही कंबर कसली आहे. सोबतच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे ठरविले असून ते वंचित बहुजन आघाडीसोबत जाण्याची शक्यता असल्याने वंचितची ताकद वाढणार असल्याचे दिसत आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने महाराष्ट्रातील सर्व 48 जागा लढविल्या होत्या. त्यात आलेल्या दारुण अपयशानंतर राज्यातील कोणत्याही निवडणुका आम आदमी पक्षाने लढविल्या नव्हत्या. राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका लढवण्याचा आम आदमी पक्षाने निर्णय घेतला असून, वंचित बहुजन आघाडीशी युती करुन निवडणुकीत काही ठिकाणी उमेदवार देण्याचा आम आदमी पक्षाचा विचार आहे.

वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्यात आघाडी होण्याची शक्यता तूर्तास मावळली असल्यानेच आम आदमी पक्षाचा वंचित बहुजन आघाडीसोबत जाण्याचा इरादा असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. आम आदमी पक्षाचे राज्यातील नेते हे ब्रिगेडीअर सुधीर सावंत आहेत असून आता ते पुढील भूमिका काय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

loading image