
Aapli ST App Live Tracking Feature
esakal
MSRTC Comuter : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांसाठी एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. ‘आपली एसटी’ (Aapli ST App) या नव्या अॅपच्या लाँचमुळे आता बसच्या वेळा आणि ठिकाणांची माहिती घेणे सोपे होणार आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या अॅपचे उद्घाटन झाले. ‘रोजमाल्टा ऑटोटेक लि.’च्या सहकार्याने विकसित झालेले हे अॅप प्रवास आणखी चांगला बनवणार आहे.