#AareyForest 'आरे' पार्थ पवार पुन्हा ट्रोल; आता कशामुळे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

नेटकऱ्यांच्या नेहमीच निशाण्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार पुन्हा एकदा आरे वाचवा या माेहिमेवर केलेल्या ट्विटने चर्चेत आले आहेत. 

आरे मुंबई ः नेटकऱ्यांच्या नेहमीच निशाण्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार पुन्हा एकदा आरे वाचवा या माेहिमेवर केलेल्या ट्विटने चर्चेत आले आहेत. 

आरे कॉलनीतील दोन हजारांहून अधिक झाडं तोडून तिथं मेट्रो प्रकल्पासाठी कारशेड उभारण्याच्या एमएमआरडीच्या निर्णयाला सर्वच पर्यावरणप्रेमी विरोध करत आहेत. आरे वाचवा या मोहिमेत पार्थ पवारांनी देखील उडी घेत दिवंगत माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आरे कॉलनीत झाडे लावतानाचा फोटो व्टिट करत मोहिमेस आपला पाठिंबा दिला आहे. पण या व्टिट वरूनच नेटकऱ्यांनी पार्थ पवार यांना ट्रोल केलं आहे.

नेटकऱ्यांनी घड्याळ पण खट्याळ झालं राव आता अशी खिल्ली उडविली आहे. एका नेटकऱ्यांने 1951 में इतना साफ फ़ोटो लेने वाला कैमरा भी available था? असा सवाल केला आहे. अनेकांनी ही झाडे नेहरूंनी लावल्यामुळे भाजप सरकार त्यांना उखडणारच असेही ट्रोल करताना म्हटले आहे. 

दरम्यान, यावरून पार्थ पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या अगोदर ते लोकसभेच्या त्यांच्य़ा भाषणावरून नंतर ते अजित पवार यांच्या राजीनाम्यावरून व आता आरे या विषयावरून ट्रोल होत आहेत. नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच ट्रोल केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: AareyForest ncp leader Parth Pawar trolled again