"24 मिनिटात त्यांनी काय..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतर सत्तारांचा 'तो' Video Viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

uddhav thackeray- abdul sattar

"24 मिनिटात त्यांनी काय..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतर सत्तारांचा 'तो' Video Viral

औरंगाबाद : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली होती. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यासाठी त्यांनी दौरा केला होता. ठाकरेंच्या या दौऱ्यानंतर राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

(Abdull sattar On Uddhav Thackeray)

"राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांचा दौरा पाहिला मी, सगळा दौरा अडीच तासाचा आणि एका शेतकऱ्याच्या बांधावर फक्त २४ मिनिटं... त्या २४ मिनिटात त्यांनी शेतकऱ्यांच्या पिकाचं काय पाहिलं मला माहिती नाही" अशी टीका अब्दुल सत्तारांनी केली आहे. तर त्यांचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

"आम्ही मागच्या २४ दिवसांपासून फिरतोय पण यांना २४ मिनिटात ओल्या दुष्काळाची परिस्थिती कशी दिसली काय माहिती? राजकाराणासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फोटो काढणं सोप्प आहे" असं वक्तव्य सत्तारांनी केलं आहे. तर उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याआधीही त्यांनी ठाकरेंवर टीका केली होती.