"शरद पवारांनी मदत केली तर मी राष्ट्रपती होणार"; बिचुकलेंचा आशावाद

राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी किमान १०० आमदारांच्या सह्याची आवश्यकता असते
abhijeet bichukale
abhijeet bichukale Sakal

मुंबई : बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं सांगितलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्था असो लोकसभा असो किंवा विधानसभा अशा सर्व निवडणुकांसाठी बिचुकले उमेदवारी अर्ज भरत असतात पण एकाही निवडणुकीत त्यांची वर्णी अजून लागलेली नाही. आता ते राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज भरणार असून अर्ज भरण्यासाठी किमान १०० आमदारांच्या सह्याची आवश्यकता असते यासाठी आपण प्रयत्न करत आहोत असं ते म्हणाले आहेत.

(Abhijeet Bichukale On President Election And Sharad Pawar)

abhijeet bichukale
ममता बॅनर्जींनी पाठवली PM मोदींना भेट; जपली ११ वर्षांची परंपरा

दरम्यान "काही आमदारांशी माझं बोलणं सुरू आहे, मी राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज भरत आहे तुम्ही सही करणार का? अशी मी विचारणा आमदारांकडे करत आहे." असं त्यांनी माध्यमांना बोलताना सांगितलं. "यामागे माझा काहीच स्वार्थ नाही, मी एक बहुजन समाजातला सामान्य व्यक्ती आहे, हुशार आहे, मला नेत्यांनी पाठिंबा द्यायला पाहिजे." असंही ते म्हणाले आहेत. यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मदत केली तर आपण राष्ट्रपती होऊ शकतो असं बिचुकले म्हणाले.

abhijeet bichukale
राज्यात मॉन्सून सक्रीय; कोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

मागच्या वेळी अभिजीत बिचुकले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मला राष्ट्रपती करा अशी मागणी केली होती. "यावर्षी मला शरद पवारांनी मदत केली तर राष्ट्रपती पदासाठी माझा मार्ग सोपा होईल. जसं शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केली तसं या नेत्यांनी मला पाठिंबा द्यायचं ठरवलं तर मला १०० सह्या सहज मिळतील. मी लढवय्या असून मी बहुजन समाजातील सामान्य व्यक्ती आहे. शरद पवारांनी मला मदत करावी." अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com