Abhishek Ghosalkar Firing : ''गाडीखाली श्वान आला तरी हे लोक गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील'', गोळीबार प्रकरणी फडणवीस काय बोलले?

मुंबईतल्या दहीसर भागामध्ये ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत काम करणाऱ्या आणि स्वतःला समाजसेवक म्हणवणाऱ्या मॉरिस भाई नावाच्या इसमाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर मॉरिसने स्वतःवरदेखील गोळ्या झाडल्या.
Abhishek Ghosalkar Firing
Abhishek Ghosalkar Firingesakal

मुंबईः मुंबईतल्या दहीसर भागामध्ये ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत काम करणाऱ्या आणि स्वतःला समाजसेवक म्हणवणाऱ्या मॉरिस भाई नावाच्या इसमाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर मॉरिसने स्वतःवरदेखील गोळ्या झाडून आत्महत्या केली.

Abhishek Ghosalkar Firing case

गुरुवारी रात्री घडलेल्या या घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी विरोधकांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. गाडीखाली श्वान आला तरी हे लोक गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील, असं विधान फडणवीसांनी केलं आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

  • अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस यांनी वर्षानुवर्षे एकत्रित काम केलेलं आहे. मॉरिसने कोणत्या कारणाने गोळ्या झाडल्या, याचा पोलिस तपास करीत आहेत.

  • हत्येप्रकरणात वेगवेगळी कारणं समोर येत आहेत. सगळ्या कारणांचा तपास झाल्यानंतर योग्य वेळी हत्येचं कारण जाहीर केलं जाईल.

  • विरोधक या घटनेचं राजकारण करीत आहेत. वैयक्तिक वैमनस्यातून घडलेली घटना असल्यामुळे यात सरकारवर प्रश्न उपस्थित करणं चुकीचं आहे.

Abhishek Ghosalkar Firing
Udgir Police Station Party: बोकड बळी प्रकरणी ९ जणांना मोठा दणका! उपनिरीक्षक निलंबित तर ८ जणांच्या केल्या बदल्या
  • विरोधक राजकीय आरोप करीत आहेत. या घटनेवरुन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणं चूक आहे. गाडीखाली श्वान आला तरी हे लोक गृहमंत्र्यांना राजीनामा मागतील.

  • या घटनेबद्दल राजीनामा मागितला तर आर्श्चय नाही. परंतु ही घटना वैयक्तिक वैमनस्यातून घडलेली आहे. आरोपीकडे बंदुक कशी आली, याचा तपास पोलिस करीत आहेत.

Abhishek Ghosalkar Firing
Pakistan Election : निवडणुकीत नवाझ शरीफ पराभूत तर जेलमधील इम्रान खान समर्थकांचा बोलबाला! पाकिस्तानात कोण आघाडीवर?

दरम्यान, दहिसर गोळीबारप्रकरणी आता पोलिसांनी मृत आरोपी मॉरिसविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आयपीसी कलम 302 तसेच शस्त्रास्त्र कायद्याच्या कलमान्वये कलम 37 (1) (अ), आणि 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई पोलिसांच्या हवाल्याने 'एएनआय'ने ही माहिती दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com