Udgir Police Station Party: बोकड बळी प्रकरणी ९ जणांना मोठा दणका! उपनिरीक्षक निलंबित तर ८ जणांच्या केल्या बदल्या

Udgir Police Station Party: काही दिवसांपूर्वी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात बोकडाचा बळी देण्याची घटना घडली होती. या प्रकरणात आता कारवाई करण्यात आली आहे.
Udgir Police Station Party
Udgir Police Station PartyEsakal

उदगीर येथील ग्रामीण पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोर देण्यात आलेल्या कथित ‘बोकड बळी’ प्रकरणी अखेर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी एका पोलिस अधिकाऱ्यावर निलंबनाची तर आठ पोलिस कर्मचाऱ्यांना मुख्यालयी पाठवण्याची कारवाई केली आहे. (Udgir Police Station Party one police officer suspended and 8 police transferred)

काही दिवसांपूर्वी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात बोकडाचा बळी देण्याची घटना घडली होती. दरम्यान, याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश उदगीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप भागवत यांना दिले होते. भागवत यांनी बुधवारी (ता.७) दिवसभर प्राथमिक चौकशी करून जिल्हा पोलिस अधीक्षकांना अहवाल पाठवला होता.

या आधारे पोलिस अधीक्षक मुंडे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक आनंद श्रीमंगल यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. बालाजी घारोळे, प्रताप माने, मुबारक मुल्ला, शिवप्रसाद रंगवाळ, माधव केंद्रे, गणेश मिटकरी, बाळासाहेब गडदे व नजीर बागवान या पोलिस कर्मचाऱ्यांची मुख्यालयी रवानगी केली आहे. निरीक्षक अरविंद पवार यांची खातेनिहाय चौकशी करण्यात येत आहे.

Udgir Police Station Party
Abhishek Ghosalkar Firing : अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी मृत मॉरिसविरोधात गुन्हा दाखल; दोघांना घेतलं ताब्यात

दरम्यान, बोकडाचा बळी अंधश्रद्धेतून दिला की अधिकाऱ्याने नवीन वाहनाच्या निमित्ताने आनंदाप्रीत्यर्थ ‘पार्टी’साठी बोकड कापला, याबाबत चौकशी सुरू असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, ही घटना चर्चेत येताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीसह कारवाईचे आदेश दिले होते.

Udgir Police Station Party
Abhishek Ghosalkar Firing: अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणात पोलिसांची कारवाई; दोन जणांना घेतलं ताब्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com