
इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी देणे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधाने करणे, या आरोपाखालील प्रशांत कोरटकरवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर तो फरार होता. त्याचा सर्वत्र शोध सुरू होता. मात्र आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अखेर प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आली आहे. तेलंगाणामधून प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आली आहे.