"एकदम परफेक्ट"; चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया

आम्हाला बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद मिळाला कारण...
bhushan esakal
bhushan esakal
Updated on

मुंबई : निवडणूक आयोगाकडून एकनाथ शिंदे यांच्या गटाला ढाल-तलवार हे चिन्ह देण्यात आलं आहे. या चिन्हाची घोषणा झाल्यानंतर त्यावर एकनाथ शिंदेंच्या गटानं समाधान व्यक्त केलं असून 'एकदम परफेक्ट' अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. (absolutely perfect first reaction of Eknath Shinde group after receiving the symbol)

bhushan esakal
Eknath Khadse: बाळासाहेबांची शिवसेना अन् RSS; खडसेंनी असा जोडला संबंध

"एकदम परफेक्ट, मराठी माणसाला काय पाहिजे? बघा आमची ढाल तलवार कशी चमकतेय. ढालीनं जनतेचं रक्षण करायचं तर कोणी अंगावर आल्यास तलावर समोर धरायची. म्हणजे या दोन्ही गोष्टी आहेत आमच्या चिन्हात आहेत. वर्षानुवर्षे शिवाजी महाराजांच्या काळापासून ढाल-तलवार वापरली जात आहे. मराठी माणसाच्या लक्षात राहिलं असं चिन्ह आम्हाला हवं होतं. आग लावणारं चिन्हं आम्हाला नको होतं, मशाल खाली पडली तर आग लागते," अशा शब्दांत शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

bhushan esakal
अनिल देशमुख यांचे पुत्र सलील यांना कोर्टाचा तात्पुरता दिलासा; काय आहे प्रकरण?

त्याचबरोबर आम्हाला चिन्ह दिलंय त्यावर आम्ही समाधानी आहोत त्यामुळं आता हेच चिन्ह घेऊन आम्ही लढणार आहोत, असं शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे म्हणाले आहेत. तर शंभूराज देसाई म्हणाले, "जे तीन पर्याय आम्ही निवडणूक आयोगाकडं दिले होते त्यांपैकी ढाल तलवार हे चिन्ह निवडणूक आयोगानं आम्हाला दिलं आहे. याचा आम्ही स्वागत करतो. अन्याय अत्याचार करणाऱ्यांविरोधात शिवाजी महाराजांनी ही ढाल तलवार वापरली होती. तलवारीचं पूजन दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे देखील करत होते त्यामुळं त्यातील तलवार आम्हाला मिळाल्यानं आम्हाला बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद आम्हाला मिळाला असल्याचं आम्ही मानतो"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com