राज्यपाल कोश्यारी यांच्या वाहनांच्या ताफ्याला अपघात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 जानेवारी 2020

  • ठाण्याच्या अप्पर जिल्हाधिकारी सुदैवाने बचावल्या

ठाणे : ठाण्यात रविवारी एका खाजगी कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहण्यासाठी येत असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ताफ्यातील पोलिसांची वाहने एकमेकांवर धडकुन अपघात घडला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यपाल पुढील वाहनातुन सुखरूप कार्यक्रमस्थळी रवाना झाले असले तरी, या दुर्घटनेत ठाण्याच्या अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे सुदैवाने बचावल्या.त्यांचे वाहन मागुन व पुढुन क्षतीग्रस्त झाले.

धक्कादायक! वाईड बॉल टाकला म्हणून गोलंदाजाची डोक्यात बॅट घालून मैदानावरच हत्या

ही दुर्घटना रविवारी सायंकाळी कासारवडवली नजीक घडली. या अपघातात सुदैवाने कुणीही जखमी झाले नसले तरी,अप्पर जिल्हाधिकारीच्या गाडीसह तीन शासकिय वाहनांचे नुकसान झाले.दरम्यान,राज्यपालांच्या ताफ्यातील पोलिसांची डिव्ही कार (इनोव्हा) वरील चालकाचे नियंत्रण सुटुन हा अपघात घडल्याची माहिती सूत्रांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident on Governor Koshyari vehicle in Thane

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: