Accident On Samruddhi Mahamarg : 'समृद्धी'वर पहिल्या अपघाताची नोंद; दोन कार धडकल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Samruddhi Mahamarg

Accident On Samruddhi Mahamarg : 'समृद्धी'वर पहिल्या अपघाताची नोंद; दोन कार धडकल्या

Accident On Samruddhi Mahamarg : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रविवारी लोकार्पण झालेल्या समृद्धी महामार्गावर पहिल्या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

हेही वाचा: Photo : 'समृद्धी', मेट्रोचे लोकार्पण; पंतप्रधान मोदींचे खास क्षणचित्रे

नरेंद्र मोदींच्या हस्ते काल समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण पार पडले. मात्र, लोकार्पणाला २४ तास उलटत नाही तोच या महामार्गावर पहिल्या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. वायफळ टोल नाक्यावर दोन कारमध्ये हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. या घटनेत सुदैवाने कोणीही गंभीर जखमी झालेले नसून दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचा: PM मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं लोकार्पण; 75,000 कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी

११ लाख ३१ हजार झाडांची लागवड होणार

समृद्धी महामार्गामध्ये दोन लाख ३६ हजार झाडे बाधित झाली. त्यामुळे महामार्गाच्या दुतर्फा ११ लाख ३१ हजार झाडे लावण्यात येणार आहेत. संपूर्ण प्रकल्पाच्या हद्दीत झाडे लावणे, सुशोभीकरण करणे, सिंचन व्यवस्था करणे, त्याशिवाय वृक्षलागवडीची पाच वर्षे देखभाल-दुरुस्ती करण्याचे कामही केले जाणार आहे.

टॅग्स :Narendra Modiaccident