
फडणवीसांचा प्रवास खडतर, पक्षांतर्गतच...,तर उद्धव ठाकरेंना 'अच्छे दिन'; ज्योतिषी अनंत पांडव यांचं भाकीत
भारतात जास्त प्रमाणावर भविष्य, कुंडली अशा गोष्टी पहिल्या जातात. यामध्ये सामान्यांना कुतूहल असते ते राजकीय नेते मंडळी आणि सिनेसृष्टीतील अभिनेते. अशातच काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डी दौऱ्यावर असताना भविष्य पाहिल्याच्या चर्चा ही रंगल्या होत्या.
अशातच आता नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधान पदावर पुन्हा एकदा विराजमान होतील. तर 2028 पर्यंतच त्यांच्या कुंडलीत हा पंतप्रधान पदाचा योग असेल, त्यानंतर पंतप्रधान पदावरून ते बाजूला होतील, अशी भविष्यवाणी औरंगाबाद येथील प्रसिद्ध ज्योतिषी, कुंडली अभ्यासक वेदमूर्ती अनंत पांडव यांनी केली आहे.
प्रसिद्ध ज्योतिषी, कुंडली अभ्यासक वेदमूर्ती अनंत पांडव यांनी फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच नाही तर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राहुल गांधी, देवेंद्र फडणवीस, योगी आदित्यनाथ यांचीही कुंडली किंवा भविष्य सांगितले आहे.
हेही वाचा: Maharashtra Politics : राज्यातील सत्तासंघर्षावर १० जानेवारीला सुनावणी
तर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कुंडलीनुसार, जानेवारी 2023 नंतर त्यांचे अच्छे दिन येण्याची शक्यता वर्तवली आहे. एप्रिल महिन्यांनंतर त्यांची राजकीय वाटचाल अगदी पूर्ववत होऊ शकते, असा दावाही अनंत पांडव यांनी केला आहे. आता काही दिवसात त्यांचे चांगले दिवस म्हणजेच सुरू असणारी सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू आहे याबाबत काही निर्णय आल्यामुळेही त्यांचे चांगले दिवस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कुंडलीत शनि, गुरुची दृष्टी असल्याने येत्या काळात उच्च पदस्थ मानसन्मान मिळेल. त्यानंतर शनिच्या साडेसातीचा उत्तरार्ध सुरु आहे. उत्तरार्धात राजपद प्राप्त करतील. पण ते पुन्हा मुख्यमंत्री पदावर राहण्याची शक्यता कमी आहे अशी भविष्यवाणी पांडव यांनी केली आहे.
हेही वाचा: Maharashtra Karnataka Dispute: सीमाप्रश्नी तोडगा निघणार? आज दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची दिल्लीत बैठक
तर अनंत पांडव यांनी वर्तवलेल्या भाकीतानुसार, देवेंद्र फडणवीस यांना आगामी काळात पक्षांतर्गत तसेच इतर राजकीय संघटनांकडूनही प्रचंड विऱोध होण्याची शक्यता यांनी वर्तवली आहे. लग्नस्थान व कर्मस्थानात बुधादित्याचा राजयोग आहे. त्यामुळे ते यावर मात करून ते यश मिळवतील असंही पांडव यांनी सांगितले आहे.
हेही वाचा: Maharashtra Politics: शिंदे-फडणवीसांच्या निकटवर्तीयांच्या साखर कारखान्यांवर सहकार खात्याची विशेष कृपा...