

बीड : मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण केल्यानंतर त्यांना अमानुष मारहाण करताना आरोपींनी पंधरा व्हिडिओ आणि फोटोही काढले. विशेष म्हणजे या प्रकरणातील अद्याप फरारी असलेला आरोपी कृष्णा आंधळे याने त्याच्या व्हॉट्सॲपवरही व्हिडिओ शेअर केल्याचे तपासात समोर आले आहे.