Acharya Tushar Bhosale I ..अन् कोणत्या तोंडाने हिंदुत्वाच्या बाता मारता जनाब उद्धव ठाकरे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

politics

..अन् कोणत्या तोंडाने हिंदुत्वाच्या बाता मारता जनाब उद्धव ठाकरे?

मुख्यमंत्री उद्ध ठाकरे यांच्या काल शिवसेनेच्या जाहीर सभेत भाजपावर सणसणीत टीका केली आहे. अनेक मुद्द्यांवरून त्यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या टीकेवर आता भाजपाकडून पलटवार होत आहे. भाजपाचे आचार्य तुषार भोसले यांनी टोला लगावला आहे. आणि कोणत्या तोंडाने तुम्ही हिंदुत्वाच्या बाता मारताय जनाब उद्धव ठाकरे असंही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा: 'दाऊदशी व्यवहार करणाऱ्याला मंत्रिमंडळात ठेवलंय हे CM ठाकरे विसरले'

यासंदर्भात आचार्य तुषार भोसले यांनी एक ट्विट केलं आहे. यात ते म्हणतात, काश्मीरी पंडित राहुल भट यांची हत्या केलेल्या आतंकवाद्यांना मोदी सरकारने २४ तासांच्या आत संपवलं कारण ते हिंदुत्वाचे रक्षक आहेत. पण इथे पालघरमध्ये साधूंची ठेचून हत्या करणाऱ्यांना २४ महिने उलटून गेले तरी अजूनही कोणताही दंड करण्यात आलेला नाही. हिंदु समाजाविषयी गरळ ओकणार सर्जिल उस्मानी अजुनही मोकाट आहे. त्याच्यावरही कोणतीच कारवाई झालेली नाही, आणि कोणत्या तोंडाने हिंदुत्वाच्या बाता मारता जनाब उद्धव ठाकरे? असा सवालही आचार्य भोसले यांनी केला आहे.

जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा, भाजपचा इशारा

आज यावर भाजपाकडून करारा जवाब मिळणार आहे. केंद्रातील मोदी सरकार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केतकी चितळे यांच्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ट्विट करुन इशार दिला आहे. सर्वत्र पळापळ अन् गदारोळ, नागरिक भयभीत अन् विरोधक दहशतीत, सर्वत्र सन्नाटा अन् लोक घामाघूम.. अरे छट हा तर निघाला आणखी एक टोमणे बाॅम्ब, असा टोला त्यांनी ठाकरेंना लगावला आहे. जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा, असा इशारा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

हेही वाचा: 'मुन्नाभाई'सारखे राज ठाकरे हिट होतील आणि तुम्ही...; नवनीत राणांचा टोला

Web Title: Acharya Tushar Bhosale Criticize To Uddhav Thackeray On Hindutva Reaction Of Bjp

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top