‘एचएसआरपी’ नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर १ जुलैपासून कारवाई! वाहनांचे हस्तांतरण, कर्जाचा बोजा चढविणे, पुनर्नोंदणी, परवाना नुतनीकरण होणारच नाही, वाचा...

१ एप्रिल २०१९ पूर्वीच्या प्रत्येक वाहनास हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन (एचएसआरपी) नंबरप्लेट बसवावीच लागणार आहे. परिवहन आयुक्तालयाने आता अशा वाहनांसाठी ‘एचएसआरपी’ नंबरप्लेट बसविण्यासाठी ३० जूनपर्यंत शेवटची मुदत देण्यात आली आहे. मुदतीनंतर ‘एचएसआरपी’ न बसविलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
HSRP Number Plates

HSRP Number Plates

Sakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात १ एप्रिल २०१९ पूर्वीची सव्वानऊ लाख वाहने आहेत. त्या प्रत्येक वाहनास हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन (एचएसआरपी) नंबरप्लेट बसवावी लागणार आहे. परिवहन आयुक्तालयाने त्यासाठी आता ३० जूनपर्यंत शेवटची मुदत दिली आहे. मुदतीनंतर मात्र ‘एचएसआरपी’ नंबरप्लेट न बसविणाऱ्या वाहनांवर ‘आरटीओ’ची वायूवेग पथके, महामार्ग पोलिस, शहर-ग्रामीणच्या वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील ७३ टक्के वाहनधारकांनी त्यांच्याकडील वाहनांना अजूनही ‘एचएसआरपी’ नंबरप्लेट बसविलेली नाही. राज्यात अशा वाहनांची संख्या ५० टक्क्यांवर आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने आता या वाहनांसाठी दीड महिन्यांची मुदत दिली आहे. मुदतीनंतर मात्र हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट न बसविणाऱ्या वाहनधारकास पहिल्यावेळी ५०० रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. या वाहनावर वाहतूक पोलिसांकडून दुसऱ्यांदा कारवाई झाल्यास त्यास आपोआप एक हजार रुपयांचा दंड पडणार आहे.

दुसरीकडे ‘एचएसआरपी’ नंबरप्लेट न बसविलेल्या वाहनांचे हस्तांतरण (एकाचे वाहन दुसऱ्याच्या नावे करणे), कर्जाचा बोजा चढविणे (जुने वाहन दुसऱ्याने घेतले आणि त्यावरील कर्जाचा बोजा नव्या मालकाच्या नावे करणे), वाहनांची पुनर्नोंदणी, वाहनात बदल करणे आणि वाहनाच्या परवान्याचे नुतनीकरण करता येणार नाही. त्यामुळे प्रत्येकांनी त्यांच्याकडील एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनास ‘एचएसआरपी’ नंबरप्लेट बसवून घ्यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे. ‘एचएसआरपी’ संदर्भात नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी dytccomp.tpt-mh@gov.in या ई-मेलवर तक्रार करावी, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

सोलापूर जिल्ह्याची सद्य:स्थिती

  • ‘एचएसआरपी’ अपेक्षित वाहने

  • ९,२६,८३९

  • ‘एचएसआरपी’ बसवलेली वाहने

  • २,६५,८२८

  • नवीन नंबरप्लेट न बसवलेली वाहने

  • ६,६१,०११

मुदतीत ‘एचएसआरपी’ नंबरप्लेट बसवावीच लागणार, अन्यथा...

१ एप्रिल २०१९ पूर्वीच्या प्रत्येक वाहनास हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन (एचएसआरपी) नंबरप्लेट बसवावीच लागणार आहे. परिवहन आयुक्तालयाने आता अशा वाहनांसाठी ‘एचएसआरपी’ नंबरप्लेट बसविण्यासाठी ३० जूनपर्यंत शेवटची मुदत देण्यात आली आहे. मुदतीनंतर ‘एचएसआरपी’ न बसविलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. याशिवाय अशा वाहनांची ‘आरटीओ’कडील बहुतेक कामे देखील तात्काळ थांबविली जाणार आहेत.

- विजय पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com