राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई! चार दिवसांत ८ वाहनांसह २२५० लिटर हातभट्टी दारू जप्त; ढाब्यावरील मद्यपींवरही वॉच

राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी हातभट्टी दारुची वाहतूक करणाऱ्या सात मोटरसायकलींसह दीड हजार लिटर हातभट्टी दारू जप्त केली आहे. शुक्रवारी (ता. २९) राज्य उत्पादन शुल्क विभागाने एका चारचाकीसह ७५० लिटर हातभट्टी दारू जप्त केली आहे.
लोकांनी रिचवली दारू
लोकांनी रिचवली दारूSakal

सोलापूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू निर्मिती, विक्री व वाहतूकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी हातभट्टी दारुची वाहतूक करणाऱ्या सात मोटरसायकलींसह दीड हजार लिटर हातभट्टी दारू जप्त केली आहे. शुक्रवारी (ता. २९) राज्य उत्पादन शुल्क विभागाने एका चारचाकीसह ७५० लिटर हातभट्टी दारू जप्त केली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षक- अ विभाग व भरारी पथकाने अवैध हातभट्टी दारू वाहतूक विरोधात संयुक्त मोहीम राबवून मंगळवारी (ता. २६) पहाटेच्या सुमारास हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणांवरून सोलापूर शहरात दारूचा पुरवठा करणाऱ्या सात दुचाकी पकडल्या आहेत. भरारी पथकाने दोड्डी ते कुंभारी रोडवर सुभाष बालू पवार (रा. दोड्डी तांडा) यास रबरी ट्यूबमधून २४० लिटर व आदेश सोमनाथ चव्हाण (रा. मुळेगाव तांडा) यास दोन रबरी ट्यूबमधून १६० लिटर हातभट्टी दारू वाहतूक करताना ताब्यात घेतले. तसेच हैदराबाद रोडवर रमेश टिक्कू राठोड (रा. मुळेगाव तांडा) याला २४० लिटर हातभट्टी दारुची वाहतूक करताना पकडले.

तसेच राज्य उत्पादन शुल्क अ विभागाच्या पथकाने अक्कलकोट रोडवर पाळत ठेवून गोविंद बाबू चव्हाण व सागर सुभाष माने या दोघांना ४२० लिटर हातभट्टी वाहतूक करताना पकडले. तसेच संत तुकाराम चौक ते गुरुनानक चौक रोडवर २०० लिटर हातभट्टी दारू जप्त केली. दुचाकीस्वार दुचाकी जागेवरच टाकून पळून गेला. मल्लिकार्जुन नगर ते अक्कलकोट रोड पुलाखाली २४० लिटर हातभट्टी दारुसह दुचाकी पकडली. या गुन्ह्यातील आरोपी फरार असून त्याचा शोध सुरु आहे. अशाप्रकारे एकाच दिवशी तब्बल चार लाख ७५ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी उपअधीक्षक सूरज कुसळे, निरीक्षक राहुल बांगर, सुनील कदम, दुय्यम निरीक्षक उषाकिरण मिसाळ, सुरेश झगडे, शिवकुमार कांबळे, सहायक दुय्यम निरीक्षक अलीम शेख, जवान किरण खंदारे, शोएब बेगमपुरे, चेतन व्हनगुंटी, अशोक माळी, नंदकुमार वेळापुरे, अण्णा कर्चे व वाहनचालक दीपक वाघमारे यांच्या पथकाने पार पाडली.

हॉटेल, ढाब्यांवर विशेष वॉच...

उत्सव कालावधीत सोलापूर जिल्ह्यातील अवैध दारू विक्री ठिकाणे, हातभट्ट्या, धाबे, हॉटेल तसेच गोवा राज्यातून येणाऱ्या दारूवर विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. त्याविरोधात कारवाई करण्यासाठी विशेष पथके नेमण्यात आली आहेत. नागरिकांनीही त्यासंबंधीची माहिती असल्यास विभागाला कळवावे, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने अधीक्षक नितीन धार्मिक यांनी केले आहे.

चारचाकीसह ७५० लिटर हातभट्टी दारू जप्त

सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माळशिरस पथकाने शुक्रवारी (ता. २९) सकाळच्या सुमारास चारचाकी वाहनासह ६३० लिटर हातभट्टी दारु जप्त केली असून इतर दोन ठिकाणी दारू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले आहे. उत्सव कालावधीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात हातभट्टी दारू निर्मिती, विक्री व वाहतुकीविरुद्ध मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शुक्रवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माळशिरस पथकाला मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार अकलूज-माळशिरस रोडवर नऊचारी येथे सापळा लावून चारचाकी वाहन (एमएच १०, ई ७२३५) पकडले. त्यात हातभट्टी दारूने भरलेल्या नऊ रबरी ट्यूबमधून ६३० लिटर हातभट्टीची अवैधरीत्या वाहतूक होत असल्याचे आढळून आले.

वाहनचालक राकेश सुभाष पवार (रा. वडजी तांडा, ता. दक्षिण सोलापूर) यास अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून बत्तीस हजार चारशे रुपये किमतीची सहाशे तीस लिटर हातभट्टी दारू, वाहन, मोबाईल असा एकूण दोन लाख बेचाळीस हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या पथकाने माळशिरस शहराच्या हद्दीतील माळशिरस- मेडद रोडवरील एका महिलेच्या घरातून ७० लिटर हातभट्टी दारु तर सदाशिवनगर (ता. माळशिरस) येथून ५५ लिटर हातभट्टी दारु जप्त केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संदीप कदम, दुय्यम निरीक्षक राजेंद्र वाकडे, सहायक दुय्यम निरीक्षक आवेज शेख, जवान गजानन जाधव, तानाजी जाधव व वाहन चालक मारुती जडगे यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com