Chandrashekhar Bawankule : राज्यातील फासेपारधी व पारधी समाजाच्या अतिक्रमित जमिनींचे सातबारे करण्यासाठी कार्यवाही होणार

पारधी व फासेपारधी समाजातील भूमिहीन कुटुंबांच्या जमिनींचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अखिल भारतीय आदिवासी महासंघासह विविध सामाजिक संस्था सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.
chandrashekhar bawankule and mangesh bhosale

chandrashekhar bawankule and mangesh bhosale

sakal

Updated on: 

मंचर - 'राज्यातील भूमिहीन पारधी व फासेपारधी समाजातील पात्र कुटुंबांनी गायरान किंवा वनक्षेत्रातील जमिनींवर अतिक्रमण करून उपजीविकेची साधने उभी केली आहेत. अशा कुटुंबांच्या जमिनी त्यांच्या नावे करण्याबाबत महसूल विभागाच्या स्तरावर कार्यवाही सुरू होण्याची अपेक्षा असून, जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित समाजबांधवांच्या अडचणी समजून घ्याव्यात, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.' अशी माहिती मंचर (ता. आंबेगाव) येथील सावित्रीबाई फुले आदिवासी आश्रमशाळेचे संस्थापक अध्यक्ष मंगेश भोसले यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com