सोनू सूद मातोश्रीवर; उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 8 June 2020

अभिनेता सोनू सूद याने शिवसेनाप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची काल (ता. ०७) रविवारी रात्री मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. यावेळी राज्याचे पर्यावरण मंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.

मुंबई : अभिनेता सोनू सूद याने शिवसेनाप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची काल (ता. ०७) रविवारी रात्री मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. यावेळी राज्याचे पर्यावरण मंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

लॉकडाऊनमुळं मुंबईत अडकून पडलेल्या मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवण्याचं काम करणारा अभिनेता सोनू सूद याला राजकारण्यांच्या टीकेला सामोरं जावं लागलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोनूच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. संजय राऊत यांच्या टीकेनंतर सोनू सूदने मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर मात्र संजय राऊत यांनी सोनू सूद या महाशयांना अखेर मुख्यमंत्र्यांचा पत्ता सापडला असल्याचे म्हटले आहे. त्यांनी ट्विट करत सोनू सूद महाशय मातोश्रीवर पोहोचले. जय महाराष्ट्र अशा अशा आशयाचे ट्विट केले आहे.

काय आहे मूळ प्रकरण?
अभिनेता सोनू सूद अनेक स्थलांतरित मजूरांना गावी जाण्यास मदत करत असताना संजय राऊत यांनी सामनामधून सोनू सूदच्या कामगिरीला अप्रत्यक्षपणे भाजपचा पाठींबा असल्याचा संशय व्यक्त केला होता. सोनू सूदला पुढे करत ठाकरे सरकार अपयशी ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय असं राऊत यांनी आपल्या लेखात म्हटलं होतं. भाजपने लॉकडाउनच्या काळात सोनू सूदचा वापरत तर केला नाही ना? असा सवाल करताना काही दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमातूनही सोनू सूदच्या कार्याचा उल्लेख पहायला मिळेल असे मत त्यांनी मांडले होते.

त्यानंतर सोनू सूदने ट्विट करत स्थलांतरीत मजूर आणि माझं नातं खूप वर्षांपासूनचं आहे. स्थलांतरीत मजूरांसाठी केलेलं कार्य फक्त एका राज्यापुरते मर्यादित नाहीत. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत ज्याने मला मदतीसाठी बोलावले त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केला. प्रत्येक राज्याच्या सरकारने माझ्या या कामात सहकार्य केलं, असल्याचे सांगितले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Sonu Sood Meets Uddhav Thackeray After Sena Leaders Criticism