Dipali Sayyed : दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना जीवे मारण्याचा कट; माजी PAचा गंभीर आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dipali Sayyed

Dipali Sayyed : दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना जीवे मारण्याचा कट; माजी PAचा गंभीर आरोप

अभिनेत्री दीपाली सय्यद वारंवार त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात परंतु यावेळी त्यांच्यावर थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जीवे मारण्याचा कट रचल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अभिनेत्री दीपाली सय्यद यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी सय्यद यांच्यावर हे गंभीर आरोप केले आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेत त्यांनी हे आरोप केले आहे.

त्याचबरोबर दीपाली सय्यद ट्रस्टतर्फे होणारे व्यवहार चुकीचे आहेत असंही म्हंटलं आहे. शिंदे यांनी केलेल्या गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र, दीपाली सय्यद यांनी त्यांच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.

तर भाऊसाहेब शिंदे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी ट्रस्टच्या माध्यमातून राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले होते. पुरस्कारामध्ये यावेळी 50 लोकांना 50 हजारांचे धनादेश देण्यात आले होते. पुरस्कारात देण्यात आलेले चेक बनावट असल्याचाही आरोप शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

हेही वाचा: Abdul Sattar: गायरान जमीन घोटाळ्याच्या आरोपांवर अब्दुल सत्तारांनी केलं स्पष्ट

दीपाली सय्यद भोसले चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून 700 ते 800 कोटी रुपयांचे व्यवहार झाले असून हा पैसा चुकीच्या मार्गाने आला असून याप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी शिंदे यांनी केली आहे. दीपाली सय्यद यांचे दाऊदसोबत संबंध असून याचे सर्व पुरावे देऊ असे देखील शिंदे यांनी म्हंटलं आहे.

हेही वाचा: Devendra Fadnavis: "मुंबई कोणाच्या बापाची..." कर्नाटक मंत्र्यावर फडणवीस संतापले

पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, भाजपचे खासदार बृज भूषण शरण सिंग यांची भेट घेऊन दीपाली सय्यद यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची हत्या करण्याचा कट रचला होता. अयोध्या दौऱ्यात भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांना सय्यद प्रोत्साहित करत होत्या, यासाठी त्यांना एका मोठ्या नेत्याचा पाठिंबा होता, असा आरोपही त्यांच्यावर शिंदे यांनी केला आहे.

हेही वाचा: Lokayukta Bill: मुख्यमंत्रीदेखील लोकायुक्त कक्षेत असणार; जाणून घ्या काय आहे लोकायुक्त कायदा?

टॅग्स :Raj Thackeray