Jitendra Awhad: आव्हाडांवर अजून कलमं लावा…; वादात उडी घेत केतकी चितळेचं पोलिसांना पत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actress Ketaki Chitale wrote a letter police to add 2 more article against ncp Jitendra Awhad

Jitendra Awhad: आव्हाडांवर अजून कलमं लावा…; वादात उडी घेत केतकी चितळेचं पोलिसांना पत्र

मुंबई: हर हर महदेव चित्रपटात इतिहासाची मोडतोड केल्यावरून आक्रमक भूमिका घेतलेले राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. ठाण्यात मॉलमधील सिनेमागृहात केलेल्या मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे, दरम्यान या वादात आता मराठी अभिनेत्री केतकी चितळेने उडी घेतली आहे.

आव्हाडांना वर्तकनगर पोलिसांकडून अटक करण्यात आले आहे, यानंतर आता केतकी चितळेच्या वतीने वर्तकनगर पोलिस स्टेशनला पत्र लिहण्यात आलं आहे. केतकीने आव्हाडांवर लावण्यात आलेली कलम कमी असल्याचे म्हटले आहे.

केतकी चितळे हिने आपल्या वकिलांच्या मार्फत एक पत्र वर्तकनगर पोलिस स्टेशनला पाठवण्यात आले आहे, यामध्ये आव्हाडांवर लावण्यात आलेली कलमे पुरेशी नाहीत असे म्हटले आहे. तसेच केतकीने लिहीलेल्या या पत्रातील प्रमुख मागण्यामध्ये कलम ३५४ हे देखील जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या साथिदारांवर लावण्यात यावं असं म्हटलं आहे. कारण की चित्रपटगृहात ज्या व्यक्तीला मारहाण झाली त्याची पत्नी देखील तेव्हा सोबत होती. तसेच या मारहाणीदरम्यान त्या महिलेला देखील मारहाण झाली आहे असे म्हटले आहे.

हेही वाचा: Jitendra Awhad Arrest: गोड गप्पांमध्ये गुंतवलं, अन्…; आव्हाडांनी सांगितला अटकेपूर्वीचा नाटकीय घटनाक्रम

तसेच, हे सगळं प्लॅनिंग करुन सर्व केलं आहे यामुळे कलम १२० ब देखील लावावे अशी मागणी केतकीने केली आहे. आव्हाडांवर सध्या लावण्यात आलेल्या कलमांमध्ये या कलमाची देखील भर घालावी अन्यथा आम्ही हायकोर्टात जाऊ आणि हायकोर्टाकडून ऑर्डर आणून ही कलमे वाढवायला लावू असे केतकी चितळेकडून पाठवण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे. दरम्यान शरद पवार यांच्यावर केल्या आक्षेपार्ह पोस्टनंतर तुरुंगात जावे लागलेल्या केतकीने आता जितेंद्र आव्हाड अटक वादात देखील उडी घेतल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा: Kirit Somaiya on Awhad: जितेंद्र आव्हाडांच्या अटकेनंतर किरीट सोमय्यांचे ट्विट; म्हणाले…

टॅग्स :jitendra awhad