esakal | राज्यभरात अॅक्युपंक्चरसाठी पात्रता परीक्षा सुरळीत | Acupuncture Exam
sakal

बोलून बातमी शोधा

 online exams

राज्यभरात अॅक्युपंक्चरसाठी पात्रता परीक्षा सुरळीत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्य अॅक्युपंक्चर (Acupuncture Exam) परिषदेमार्फत रविवारी (ता. १०) घेण्यात आलेली पात्रता परीक्षा (Eligible Test) सुरळीत पार पडली. देशातील विविध राज्यांतील विद्यार्थ्यांनी (students participation) परीक्षेला भरभरून प्रतिसाद (Great response) दिल्याची माहिती परिषदेचे प्रबंधक नारायण नवले (Narayan Navale) यांनी दिली.

हेही वाचा: मालाडमध्ये इस्टेट एजंटची गळफास घेऊन आत्महत्या; तिघांवर गुन्हा दाखल

राज्यात आणि बाहेर ॲक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीच्या क्षेत्रात‍ करिअर आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने पात्रता परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी पात्र असलेल्या ६ हजार ३८४ उमेदवारांपैकी ५ हजार ४३८ जण उपस्थित होते. केवळ ९४६ जण अनुपस्थित राहिल्याची माहिती परिषदेकडून देण्यात आली. अॅण्ड्रॉईड मोबाईल, लॅपटॉप आणि डेस्कटॉपद्वारे परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, आयफोनवर परीक्षा आणि त्यासाठीची यंत्रणा उपलब्ध नसल्याचे परिषदेकडून काही दिवस आधीच स्पष्ट करण्यात आले होते. लवकरच निकालाची तारीख जाहीर केली जाईल.

loading image
go to top