MSRDC वांद्रे रिक्लेमेशनचा मोक्याचा 24 एकराचा भूखंड 'अदानी'ने पटकावला; महामंडळाला मिळणार ८ हजार कोटींचा महसूल

वांद्रे रिक्लेमेशन येथे मोक्याच्या ठिकाणी असलेला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) मालकीचा तब्बल २४.२ एकराचा भूखंड अदानी रियल्टीने पटकावला आहे. अदानी आणि एल अँड टी यांनी सदर भूखांडासाठी अंतिम बोली लावली होती.
Adani
Adani esakal

मुंबई: वांद्रे रिक्लेमेशन येथे मोक्याच्या ठिकाणी असलेला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) मालकीचा तब्बल २४.२ एकराचा भूखंड अदानी रियल्टीने पटकावला आहे. अदानी आणि एल अँड टी यांनी सदर भूखांडासाठी अंतिम बोली लावली होती.

मात्र अदानीची सर्वाधिक बोली ठरल्याने सदरचा भूखंड त्यांना मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. मात्र त्यावर अंतिम शिक्कामोर्तब महामंडळाच्या पुढील आठवड्यात होणा-या बैठकीत होणार आहे. दरम्यान या भूखंडाच्या माध्यमातून एमएसआरडीसीला सुमारे ८ हजार कोटी रूपयांचा महसूल मिळणार आहे.

Adani
Sunny Leone Admit Card : उत्तर प्रदेश पोलिसात भरती होण्यासाठी चक्क सनी लिओनीची अर्ज! प्रशासनाचा एकच गोंधळ

वांद्रे पश्चिम येथे एमएसआरडीसीचा भूखंड आहे. त्याच्या विक्रीसाठी महामंडळाने निविदा काढल्या होत्या. त्यामध्ये अनेक कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या. मात्र अंतिम निविदांसाठी अदानी रियल्टी आणि एल अॅण्ड टी कंपनी पात्र ठरली होती. त्यानुसार दोन्ही कंपन्यांनी भरलेल्या निविदा नुकत्याच उघडण्यात आल्या असून त्यामध्ये सदर भूखंडाच्या विकासातून मिळणा-या महासूलाच्या सुमारे २२. २७ टक्के हिस्सा महामंडळाला देण्याचा बोली अदानीने लावली होती, तर एल अँड टीने १८ टक्के हिस्सा देण्याची बोली लावली होती.

यामध्ये अदानी रियल्टीची सर्वाधिक बोली ठरल्याने सदरचा भूखंडा त्यांना मिळणार असल्याचे निश्चत झाले असल्याची माहिती एमएसआरडीसीच्या अधिका-याने दिली.

Adani
Pune University : विद्यापीठ चौकाला दिलासा! पोलिसांकडून वाहतुकीत बदल, विद्यापीठात मिलेनियम गेटमधून प्रवेश

भूखंड मल निस्सारण केंद्रासाठी आरक्षित होता

एमएसआरडीसीकडून अदानीला दिली जाणारा २४ एकराचा भूखंड नव्या विकास आराखड्यानुसार मुंबई महापालिकेच्या मलनिस्सारण केंद्रासाठी आरक्षित होता. मुंबईवरील भार दिवसोंदिवस वाढत असून गगणचुंबी इमारती उभा राहत आहेत. त्यामुळे मलनिस्सारण केंद्रांची गरज आणि क्षमता वाढवण्याची गरज आहे. त्यापाश्वभूमीवार मुंबईत सात ठिकाणी मलनिस्सारण केंद्र उभारण्याचे प्रस्तावित असून त्यामध्ये वांद्रे येथे एक करणे गरजेचे आहे असा दावा वाॅचडाॅग फाऊंडेशनने केला आहे. मात्र आता सदरचा भूखंडच खासगी विकासकाला दिल्याने सदरचे मलनिस्सारण केंद्र कुठे उभारायचे असा प्रश्न निर्माण होऊ शकणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com