
'आधी बुलेट ट्रेन, समृद्धीवर चर्चा, आता...'; सदाभाऊंची मविआवर टीका
मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात हनुमान चालिसा आणि मशिदींवरील भोंगे यावरून राजकारण सुरू आहे. या दरम्यान आमदार सदाभाऊ खोत यांनी भाजप सत्तेत होते त्या दिवसांचा दाखला देत सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार (MVA Govt)ला टोला लगवला आहे.
विकासाच्या मुद्द्याववरून भाजप आणि सत्ताधाऱ्यामध्ये वेळोवेळी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतात. त्यात जेव्हापासून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले आहे तेव्हापासून भाजपकडून वेळोवेळी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे.
यातच सदाभाऊ खोत यांनी ट्विट करत मविआ सरकारवर निशाणा साधला आहे, त्यांनी, "भाजप सत्तेत असताना बुलेट ट्रेन, हायपर लूप, समृद्धी महामार्ग, जलयुक्त शिवार etc अशा गोष्टीवर चर्चा असायचा..! , पण आता महाराष्ट्रात चर्चा असते ती देशमुख, मलिक कांड, खंडणी, हाणामारी, घरकोंबडा, पेपर घोटाळा, आरक्षणाचा बट्याबोळ अशा विषयावर असते..!, फरक समजून घ्या..!" असे देखील त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा: राष्ट्रवादीचीही हिंदुत्वाच्या शर्यतीत उडी? रोहित पवार म्हणतात..
हेही वाचा: राज ठाकरे पुण्यात पोहोचण्याधीच घडामोडी, वसंत मोरे करणार महाआरती
Web Title: Sadabbhau Khot Criticized Mva Govt Over Development In Maharashtra
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..