अदिती तटकरेंनी फडणवीसांचा फोटो पाहून दोन शब्दात सांगितली ओळख

Aditi Tatkare saw the face of Fadnavis and introduced himself in two words
Aditi Tatkare saw the face of Fadnavis and introduced himself in two wordsAditi Tatkare saw the face of Fadnavis and introduced himself in two words
Updated on

महाराष्ट्रात महाविकास आघाडीने सरकार स्थापन केल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईल... मी पुन्हा येईल... मी पुन्हा येईल...’ असे विधान केले होते. मात्र, ते अद्याप सरकार स्थापन करू शकलेले नाही. यामुळे ते कधी येतील आणि कधी भाजपचे सरकार स्थापन करतील याची उत्सुकता भाजपसह विरोधकांनाही आहे. त्यांच्या याच वक्तव्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अदिती सुनील तटकरे (Aditi Tatkare) यांनी ‘पुन्हा येईल’ असे दोन शब्द बोलून देवेंद्र फडणवीस यांची ओळख सांगितली. (Aditi Tatkare saw the face of Fadnavis and introduced himself in two words)

सरकारनामातर्फे ‘फेस ऑफ’ हा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमात विविध पक्षाचे नेते सहभागी झाले होते. यावेळी व्यासपीठावर असलेल्या अदिती तटकरे यांना निवेदकाने नेत्यांचे चेहरे पाहून थोडक्यात ओळख सांगण्यास सांगितले होते. यावेळी त्यांना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा दाखवण्यात आला. त्यांनी ‘पुन्हा येईल’ असे दोन शब्द बोलून देवेंद्र फडणवीस यांची ओळख सांगितली.

Aditi Tatkare saw the face of Fadnavis and introduced himself in two words
मुलींना घालायला लावायचा बिकिनी अन् शारीरिक संबंधाची जबरदस्ती; नंतर...

त्यांच्या वक्तव्यानंतर समोर बसलेले नेते हसायला लागले. दरम्यान एकाने अदिती ठाकरे यांना उत्तर देण्यास मदत केली. ‘देवेंद्र फडणवीस हे महाविकास आघाडीला मदत करू शकतात.’ असे म्हटले. याला होकार देत त्यांनी ‘देवेंद्र फडणवीस यांचा अनुभव जास्त असून ते जास्त मदत करू शकतात’ असे म्हटले. यानंतर समोरच्याने ‘ते चांगले विरोधक आहे. त्यांनी त्याच पदावर कायम राहावे’ असे म्हटले. त्यांच्या उत्तराला अदिती तटकरे (Aditi Tatkare) याही सहमत झाल्या आणि सर्वजण हसायला लागले.

सरकार स्थापनेचा केला होता गाजावाजा

विधानसभा निवडणुकीत भाजपचेच सरकार येईल आणि आपणच मुख्यमंत्री होणार असल्याचे देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) सांगत होते. मात्र, सर्वाधिक जागा जिंकल्यानंतरही देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापन करता आले नाही. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबत मिळून पहाटे सरकारही स्थापन केले. मात्र, हे सरकार दोनच दिवस टिकले होते. यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी मिळून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले.

‘पुन्हा येईल’ असे म्हणून उडवली खिल्ली

तेव्हापासून देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) ‘मी पुन्हा येईल... मी पुन्हा येईल... मी पुन्हा येईल...’ असे म्हणत फिरत होते. त्यांच्या पक्षाचेही नेते त्यांच्‍या हो ला हो देत होते. मात्र, अद्याप महाविकास आघाडीचे सरकार पडलेले नाही. यामुळेच की काय अदिती तटकरे यांनी ‘पुन्हा येईल’ असे म्हणून त्यांची खिल्ली उडवली असावी.

Aditi Tatkare saw the face of Fadnavis and introduced himself in two words
एकाचवेळी १९ अधिकारी बडतर्फ; रेल्वेने पहिल्यांदाच केली अशी कारवाई

काँग्रेसचे नेते राहुल यांनी यांचा चेहरा दाखवला असता मिसइंटरप्रिटेड नॅशनल लीडर असे अदिती तटकरे म्हणाल्या. कारण, कायम राहुल गांधी यांची खिल्ली उडवली जाते. त्यांच्या नावाने जोक्स तयार केले जाते. सतत विरोधक टिका करीत असतात. राहुल गांधींच्या वक्तव्याचा नेहमी चुकीचा अर्थ लावला जातो. यामुळे अदिती तटकरे यांनी त्यांचा उल्लेख मिसइंटरप्रिटेड नॅशनल लीडर असा केला आहे.

मुकेश अंबानी भारताचा अभिमान!

अदिती तटकरे यांना निवेदकाने मुकेश अंबानी यांचा चेहरा दाखवला. यावेळी अदिती यांनी त्यांचा उल्लेख ‘भारताचा अभिमान’ असा केला. तसेच अनेक नेत्यांचे चेहरे दाखवले असता उत्तरे दिली. यात समीर वानखेडे, नवाब मलीक, अमोल कोल्हे आदींच्या चेहऱ्यांचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com