Aditya Thackeray: आदित्य ठाकरे म्हणाले 'खुर्ची लैच इंटरेस्टींग या इकडं', फडणवीस म्हणतात मीही ते...; | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aditya Thackeray and Devendra Fadnavis dinner winter season nagpur

Aditya Thackeray: आदित्य ठाकरे म्हणाले 'खुर्ची लैच इंटरेस्टींग या इकडं', फडणवीस म्हणतात मीही ते...;

हिवाळी अधिवेशन सुरू आहे. पहिल्या दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली असल्याची पाहायाला मिळाली. मात्र, सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. त्यामध्ये फडणवीस ठाकरेंची डिनर पे चर्चा पाहायाला मिळत आहे. (Aditya Thackeray and Devendra Fadnavis dinner winter season nagpur )

यवतमाळ हाऊस येथे स्नेहमेळाव्याच आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला नागपूर अधिवेशनासाठी आलेले सर्वपक्षीय नेते आवर्जून हजर होते, त्यावेळी अनेक राजकीय विरोधक नेत्यांची एकत्रितपणे जुगलबंदी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या गप्पा-टप्पा, हास्स मैफिल आणि जेवणाची पंगत कॅमेऱ्यात कैद झाली.

सत्तासंघर्षानंतर भाजप आणि शिवसेना यांच्यात मोठी दरी निर्माण झाली आहे. दोघांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसतात. एकमेकांविरोधात टोकाची टीका करत असताते. मात्र, स्नेहमेळाव्यात एकाच टेबलावर हसत खेळत जेवताना दिसले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उत आला आहे.

Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

मिळालेल्या माहितीनुसार, खुर्चीवरुन आदित्य ठाकरे आणि फडणवीस यांच्यात जुगलबंदी रंगली असल्याची पाहायला मिळाली.

काय रंगली चर्चा?

खुर्ची या विषयावर चर्चा सुरू असताना फडणवीसांना उद्देशून आदित्य ठाकरे म्हणाले खुर्ची इंटरेस्टींग आहे, त्यावर फडणवीस लगेच उत्तरले... तेच म्हणतोय मी, बोर्डासहीतच बोलतोय. मग, आदित्य ठाकरेंनी पुन्हा त्यावर आपलं मत मांडलं. मग काय करू, बोर्ड त्याबाजुला घेऊ... तुम्ही या बाजुला या... असे म्हणत आदित्य यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं. त्यावेळी, जेवणाच्या टेबलावर एकच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा: Maharashtra Politics: जयंत पाटलांच्या निलंबनानंतर पवार ऍक्शन मोडमध्ये; अजित पवारांना केला फोन अन्...

आयोजित कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार सचिन अहीर, शिवसेनेचे तरुण नेते आदित्य ठाकरे, माजी मंत्री अनिल परब, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारीदेखील हजर होते.