प्रत्‍येक गोष्टीत भाजपकडून सुडाचं राजकारण; आदित्‍य ठाकरे संतापले

Aditya Thackeray
Aditya Thackerayesakal
Summary

राज्यातील राजकारणात आरोप-प्रत्यारोपात अश्‍‍लील भाषा वापरली जात आहे.

सातारा : जागतिक तापमानवाढ हा विषय आपल्या घरात येऊन बसला आहे. या विषयावर संपूर्ण जग काम करत असून, त्यात सहभागी होणे आपले काम आहे. हे काम आपण पुढाकार घेऊन न केल्यास आगामी काळात आपल्याला गंभीर सामाजिक प्रश्न, स्थलांतर आणि इतर आरोग्य प्रश्नांचा सामना करावा लागेल, अशी भीती व्यक्त करत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी जीवनशैलीत सर्वांनी बदल करणे गरजेचे असल्याचे येथे सांगितले. याचवेळी त्यांनी सगळेच विषय मत, राजकारण नजरेसमोर ठेवून करायचे नसतात, अशी टिप्‍पणी केली.

जिल्हा बँक आणि लायन्स क्लब यांच्या वतीने ग्लोबल वॉर्मिंग (Global Warming) आणि ग्लोबल वॉर्निंग या विषयावर आयोजित कार्यशाळेचे उद्‌घाटन श्री. ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik-Nimbalkar), उपसभापती नीलमताई गोऱ्हे (Neelam Gorhe), सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार वंदना चव्हाण, आमदार मकरंद पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा बँकेचे अध्‍यक्ष नितीन पाटील, लायन्सचे पदाधिकारी उपस्थित होते.

Aditya Thackeray
प्रेमासाठी काय पण! पत्नीच्या उपचारासाठी डॉक्टरनं MBBS पदवी ठेवली गहाण

श्री. ठाकरे म्हणाले,‘‘ पर्यावरणीय बदलाचा सर्वाधिक फटका शेतकरी वर्गाला बसत आहे. दुष्काळी भागातही आता ढगफुटी, अतिवृष्टी, गारपीट होत आहे. यामागे जागतिक तापमान वाढ आहे. नुकसानीची भरपाई सरकार निकषांनुसार देते. पण, त्यामुळे मूळ जागतिक तापमान हा विषय संपत नाही. आज मोठ्या प्रमाणात शहरीकरण होतेय, ही आनंदाची बाब मानली तरी दुसरीकडे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, ही दुःखाची बाब आहे. विकास हवाच; पण तो पर्यावरणपूरक हा आमचा अजेंडा आहे. हा अजेंडा सर्वांनी एकत्र न राबविल्यास आपणास आगामी काळात नेटच्या हॉटस्पॉटप्रमाणे ऑक्सिजन हॉटस्पॉट शोधावे लागतील. पर्यावरण बदलाचे सूक्ष्म आणि उघड परिणाम दिसून येत असून, ते कमी करणे, रोखणे आपल्या हातात आहे. यात अपयश आल्यास गंभीर सामाजिक परिणामाचा आपल्याला मुकाबला करावा लागेल.’’

Aditya Thackeray
राजकारण बदलणार! भोसले-पाटील गटाला 'नानां'ची साथ?

...त्यामुळे बदलली भाषा

राज्यातील राजकारणात आरोप-प्रत्यारोपात अश्‍‍लील भाषा वापरली जात असून, आज खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तशी भाषा वापरल्‍याबद्दल विचारले असता, ठाकरे म्हणाले, भाजपकडून (BJP) सुडाचे राजकारण सुरू असून, अनेक वेळा बिनबुडाचे राजकारण करण्यात येत आहे. भाजपच्या या कृत्यामुळे आरोपांना प्रत्‍युत्तर देताना भाषा बदलल्याचे स्पष्ट करत त्यांनी संजय राऊत यांच्या भूमिकेचे समर्थन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com