आदित्या ठाकरे यांनी ट्विटरवरुन मंत्रीपदाचा उल्लेख हटवला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

aaditya thackeray

आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन मंत्रीपदाचा उल्लेख हटवला

महाराष्ट्रात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळुन निघाले आहे. शिवसेनेने भाजपासोबत सरकार बनवावं, मंत्रिपद दिलं नाही तरी चालेल अशी भूमिका शिंदेंनी घेतली आहे. आज दुपारी शिंदे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटणार असून आपला गट हीच खरी शिवसेना असा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान, राज्याचे कॅबिनेट मंत्री अदित्या ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मंत्रीपदाचा उल्लेख हटवला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

हेही वाचा: 'जास्तीत जास्त काय होईल? सत्ता जाईल...' शिंदेंच्या फोननंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेकडे असणारी अतिरिक्त मतं काँग्रेससाठी वापरण्याच्या मुद्द्यावरुन एकनाथ शिंदे आणि अदित्य ठाकरे यांच्यात वाद निर्माण झाला होता. शिवसेनेची अतिरिक्त मतं काँग्रेससाठी वापरण्याला शिदेंचा विरोध होता.

हेही वाचा: Eknath Shinde Live: पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे राजीनाम्याच्या तयारीत? 'या' कृतीमुळे चर्चा

शिवसेनेची अतिरिक्त मतं काँग्रेससाठी वापरण्याला शिदेंचा विरोध होता. दोन दिवसांपूर्वी रिनायसेन्स हॉटेलमध्ये वाटाघाटी सुरु होत्या. विधान परिषदेसाठी मतदान कशापद्धतीने केलं जावं याबद्दल चर्चा सुरु होती. याच मुद्द्यावरुन शिंदेंचे राऊत आणि आदित्य ठाकरेंशी मतभेद झाले. शिवसेनेची मतं वापरुन काँग्रेसचा उमेदवार निवडून देण्याच्या कल्पनेला शिंदेंचा विरोध होता. याच मुद्द्यावरुन दोन्ही बाजूकडून जोरदार बाचाबाची झाली.

या सर्व घडामोडी पाहता अदित्य ठाकरेंबद्दल राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत.

Web Title: Aditya Thackeray Deleted The Mention Of Ministerial Post From Twitter Political Crisis In Maharashtra Dro95

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top