शिंदे गटाने फास आवळला? दिशा सालीयनप्रकरणात पुन्हा चौकशीसाठी SIT: Aditya Thackeray | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aditya Thackeray

Aditya Thackeray: शिंदे गटाने फास आवळला? दिशा सालीयनप्रकरणात पुन्हा चौकशीसाठी SIT

दिशा सालियन मृत्यू प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची अखेर एसआयटी मार्फत चौकशी होणार आहे. हे. विशेष म्हणजे दिशा सालियनचा मृत्यू ही आत्महत्या असल्याचं सीबीआयने म्हटलं होतं. त्यानंतरही फडणवीस यांनी हे प्रकरण एसआयटीकडे सोपवलं आहे. फडणवीस यांच्या या घोषणेमुळे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.(Aditya Thackeray Disha Salian death case SIT Devendra Fadnavis)

भाजप आमदार अमित साटम यांनी दिशा सालियन प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी विधानसभेत केली होती. त्यानंतर अनेक नेत्यांनी या मागणीला जोर धरला.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदस्यांची ही मागणी मान्य करत हे प्रकरण एसआयटीकडे सोपवत असल्याचं जाहीर केलं. दिशा सालियन प्रकरणाची एसआयटीकडून चौकशी केली जाईल. ज्यांच्याकडे या प्रकरणाचे काही पुरावे असतील तर त्यांनी ते पोलिसांना द्यावेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सीबीआयने वेगळा गुन्हा दाखल केला नव्हता. मात्र सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात हे प्रकरणही तपासण्यात आला. दिशाचा मृत्यू झाला त्यादिवशी ती नशेत होती आणि तोल गेल्याने छतावरून खाली पडून तिचा मृत्यू झाला असं सीबीआय तपासात समोर आलंय. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात कोणताही पॉलिटिकल अँगल नाही. शिवाय साक्षीदारांचे जबाब, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि इतर तथ्यांच्या आधारे सीबीआयने हा निष्कर्ष काढला होता.

टॅग्स :Aditya Thackeray