Disha Salian : आदित्य ठाकरे अडचणीत? 'त्या' प्रकरणाच्या चौकशीबाबत CM शिंदेंचं सूचक विधान

Eknath Shinde And Aditya Thackeray
Eknath Shinde And Aditya Thackeray

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यानंतर आता शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दिशा सालियान आणि इतरांच्या फोनवर आदित्य ठाकरेंच्या नावानं फोन आल्याचा दावा त्यांनी बिहार पोलिसांच्या हवाल्यानं केला आहे. त्यातच आता एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाबाबत सूचक विधान केलं आहे. (Aditya Thackeray news in Marathi)

Eknath Shinde And Aditya Thackeray
Maharashtra Politics : ठाकरे गटाला पुन्हा हादरा! संजय राऊतांच्या जामीनदाराचीच हकालपट्टी

एकनाथ शिंदे म्हणाले की, या केसच्या संदर्भात महाराष्ट्राच्या जनतेमध्ये संभ्रम होता. मी त्याची माहिती घेऊन बोलतो. शिंदे यांनी एकप्रकारे चौकशीचे संकेत दिल्याचं स्पष्ट होत आहे.

लोकसभेत बुधवारी नियम १९३ अतंर्गत ड्रग्ज संदर्भात लघू चर्चा पार पडली. या विषयावर बोलताना शिंदे गटाचे खासदार आणि गटनेते राहुल शेवाळे यांनी म्हटलं की AUचा विषय खूपच गंभीर आहे. AUचा अर्थ 'अनन्या उद्धव' असं नाही तर आदित्य उद्धव ठाकरे असंही बिहार पोलिसांनी म्हटलं आहे. मुंबई पोलिसांचा तपास वेगळा, बिहार पोलिसांचा तपास वेगळा तसेच सीबीआयचा तपास वेगळा आहे. त्यामुळं लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत.

Eknath Shinde And Aditya Thackeray
Winter Session : महिलांची शोधाशोध संपणार! सार्वजनिक पार्किंगमध्येही आता महिलांसाठी राखीव जागा

दरम्यान या प्रकरणाचा खुलासा झाला पाहिजे. त्यामुळं मंत्र्यांद्वारे मी जाणू इच्छितो की, दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपूत यांच्यामध्ये झालेल्या मेसेजमधील चर्चेची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शेवाळे यांनी यावेळी केली होती.

दुसरीकडे ठाकरे गटाने राहुल शेवाळे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राहुल शेवाळेंचं लग्न ठाकरेंनी कसं वाचवलं हे आम्हाला माहित आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com