आदित्य ठाकरे यांना मंत्रिपद नाही?

दीपा कदम
Thursday, 28 November 2019

संसदीय कामकाजात पहिल्यांदा प्रवेश करत असलेल्या आदित्य ठाकरेंनी विधिमंडळात आमदारकीची शपथ घेणारा ‘पहिला ठाकरे’ ठरला. मात्र युवासेनेचे अध्यक्ष असलेले आदित्य ठाकरे शिवसेनेचा तरुण चेहरा असला तरी मंत्रिमंडळातून त्यांना दूर ठेवले जाण्याची शक्‍यता आहे.

मुंबई - संसदीय कामकाजात पहिल्यांदा प्रवेश करत असलेल्या आदित्य ठाकरेंनी विधिमंडळात आमदारकीची शपथ घेणारा ‘पहिला ठाकरे’ ठरला. मात्र युवासेनेचे अध्यक्ष असलेले आदित्य ठाकरे शिवसेनेचा तरुण चेहरा असला तरी मंत्रिमंडळातून त्यांना दूर ठेवले जाण्याची शक्‍यता आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांचा दूत म्हणून राज्यभरात आदित्य फिरणार असून, ते कोणत्याही मंत्रिपदापेक्षा महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळतील.  

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

विधिमंडळाच्या कामकाजात अननुभवी असणाऱ्या आदित्य यांना थेट ‘रेड कार्पेट’ घातले जाऊन राबणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनात अढी निर्माण होऊ नये यासाठी त्यांनी विधिमंडळ कामकाजाचे धडे गिरवावेत, असे स्पष्ट संकेत दिले जात आहेत. 

राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीच्या सरकारचे नेतृत्व उद्धव ठाकरे करणार असले, तरी कॅबिनेट मंत्रिपदापासून आदित्य यांना दूर ठेवले जाणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे.

शिवसेनेच्या वाट्याला मुख्यमंत्रिपदासह १५ मंत्रिपदे मिळत असल्याने प्रादेशिक समतोल साधण्यात शिवसेनेला अवघड जात आहे. आदित्य यांनी विधिमंडळाचे कामकाज समजून घेण्यावर भर द्यावा, याकडे लक्ष दिले जात आहे. 

ठाकरे कुटुंबाची संघटनेवरील पकटही सुटणार नाही आणि आदित्य महाराष्ट्राच्या राजकारणाशी अधिकाधिक जोडले जातील, या भर दिला जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aditya Thackeray no minister