Aaditya Thackeray: …मला तर आता मळमळायला लागलं आहे; असं आदित्य ठाकरे का म्हणाले? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aaditya Thackeray

Aaditya Thackeray: …मला तर आता मळमळायला लागलं आहे; असं आदित्य ठाकरे का म्हणाले?

खोके सरकार अजूनही राजकारणात अडकलेले आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना अजूनही मदत केलेली नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे. या टीकेदरम्यान, त्यांनी केलेले एक विधान सध्या चर्चेत आलं आहे. ( Aditya Thackeray On Maharashtra Government Eknath Shinde Devendra Fadnavis )

दिवाळीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात आदित्य ठाकरे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. खोके सरकार अजूनही राजकारणात अडकलं आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना अजूनही त्यांनी मदत केलेली नाही अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केला आहे. होर्डिंगच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी आता आपल्याला मळमळायला लागलं आहे असं उपहासात्मकपणे म्हटलं.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

“खरे मुख्यमंत्री कोण आहेत? हे सरकार अजूनही राजकारणातच अडकलं आहे. घटनाबाह्य सरकारने कामही करायचं असतं, हे त्यांना अजूनही जाणवलेलं नाही. राज्यात केवळ राजकीय घोषणा दिल्या जात आहेत. पण जनतेचा आवाज कुठेही ऐकला जात नाही,” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

तसेच, राज्यातील प्रत्येक महामंडळाच्या बस स्थानकावर शिंदे सरकारचे होर्डिंग्स लागले आहेत. या होर्डिंगसाठी पैसे दिले आहेत की नाही? हे अजूनही माहीत नाही. दिले असतील तर कुणी दिले? आणि दिले नसतील तर याची नुकसानभरपाई कोण करणार? हेही माहीत नाही. शहरात अनेक ठिकाणी बेकायदेशीर बॅनर लावले आहेत. पण महापालिकेकडून कुठेही कारवाई केली जात नाही. एवढे सगळे राजकीय होर्डिंग्स पाहून मला मळमळायला लागलं आहे,” असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.